दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतून (South Film Industry) आणखी एक दु:खद बातमी समोर आली आहे. मल्याळम अभिनेत्री रंजुषा मेननच्या (Renjusha Menon) निधनानंतर अभिनेत्री डॉ. प्रियाचे (Dr Priya) निधन झाले. या दु:खातून सावरत नाही तोवर टॉलिवूडला आणखी एक धक्का बसला आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता रघु बलैया उर्फ ज्युनिअर बलैया यांचे निधन (Junior Balaiah Death) झाले आहे.
या अभिनेत्याचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ७० व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे टॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. ज्युनिअर बलैया यांच्या निधनानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे चाहते आणि सेलिब्रिटी श्रद्धांजली वाहत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
इंडिया टूडेने दिलेल्या माहितीनुसार, तमिळ अभिनेते ज्युनियर बलैया यांचे चेन्नई येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. जुनिअर बलैया हे दिवंगत दिग्गज अभिनेते टीएस बलैया यांचे चिरंजीव होते. आज संध्याकाळी अभिनेत्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
ज्युनिअर बलैया यांनी आपल्या करिअरची सुरूवात १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मेलनाट्टू मारुमागल' या चित्रपटातून केली. 'करागट्टकरन', 'सुंदरा कंदम', 'विजेता' आणि 'सत्ताई' या चित्रपटात त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. ज्युनिअर बलैया यांनी फक्च चित्रपटच नाही तर टीव्ही शोमध्ये देखील काम केले आहे. 'वाजकई' और 'चिन्ना पापा पेरिया पापा' या शोमध्ये ते सहभागी झाले होते.
28 जून 1953 रोजी जन्मलेल्या ज्युनियर बलैयाने चित्रपटांपूर्वी काही नाटकांमध्ये काम केले होते. ज्युनिअर बलैया हे शेवटी 'येनंगा सर उंगा सत्तम' या चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यांनी आतापर्यंत १०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी तमिळ चित्रपटांमध्ये अनेक चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.