Namrata Sambherao, Omkar Bhojane Saam Tv
मनोरंजन बातम्या

Maharashtrachi Hasyajatra: ओंकार भोजनेच्या तोंडून 'ते शब्द' एकूण नम्रता झाली भावुक, पाहा VIDEO

Namrata Sambherao On Omkar Bhojane: ओंकार भोजनेच्या तोंडून 'ते शब्द' एकूण नम्रता झाली भावुक

Satish Kengar

Namrata Sambherao On Omkar Bhojane:

अभिनेता ओंकार भोजने याच्या कविता चाहत्यांना नेहमीच आनंद देतात. त्याच्या कविता ऐकण्यासाठी सारेच उत्सुक असतात.

‘एकदा येऊन तर बघा’ या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित चित्रपटाच्या प्रमोशन निमित्ताने ओंकार भोजने, नम्रता संभेराव, वनिता खरात या कलाकारांनी नुकतीच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

यावेळी ओंकारने सादर केलेल्या कवितेने अभिनेत्री नम्रता संभेराव भावुक झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटात हे तिन्ही कलाकार महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. (Latest Marathi News)

विशेष म्हणजे हे तिन्ही कलाकार एकदा येऊन तर बघा चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र येणार असल्याने त्यांचे चाहते सुखावले आहेत. एकदा येऊन तर बघा' चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक क्रिशन चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विनपद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ.झारा खादर यांची आहे.

चित्रपटाची कथा परितोष पेंटर यांची असून पटकथा, संवाद प्रसाद खांडेकर यांचे आहेत.येत्या २४ नोव्हेंबरला 'एकदा येऊन तर बघा' ही मनोरंजनाची सुपरफास्ट एक्स्प्रेस आपल्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking and voice change: सिगारेट ओढल्याने आवाज घोगरा होतो? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT