Salman Khan Fee For Bigg Boss OTT 2: आपल्या अभिनयाने टेलिव्हिजनसृष्टीत कलाकारांचे वेतन किती असेल याची तुम्हाला कल्पना आहे का? सध्या टेलिव्हिजनवर टीआरपीच्या शर्यतीत पुढे असणाऱ्या कलाकारांमध्ये कोणत्या अभिनेत्याचं किंवा कोणत्या अभिनेत्रीचं पारडं सर्वाधिक जड आहे, याची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा असते.
नेहमीच टीआरपीमध्ये अव्वल ठरलेल्या कपिल शर्मा शो चा होस्ट कपिल शर्मा देखील या शर्यतीत मागे पडला आहे. वादग्रस्त टीव्ही शो ‘बिग बॉस’चा होस्ट सलमान खान सर्वाधिक “Highest Paid” कलाकार आहे.
नुकतीच ‘बिग बॉस ओटीटी सीझन २’ ची घोषणा करण्यात आली असून या शोचे होस्टिंग सलमान खान करणार असल्याचं अखेर कन्फर्म झाले आहे. अशातच त्याच्या मानधनाबद्दल आता सर्वाधिक मोठी माहिती मिळाली आहे. आतापर्यंत कपिल शर्मा (द कपिल शर्मा शो), कंगना रनौत (लॉक अप), करण जोहर (कॉफी विथ करण) पासून अमिताभ बच्चन (कौन बनेगा करोडपती) सारख्या मोठ-मोठ्या कालकारांनी देखील या टेलिव्हिजन विश्वात आपले नशीब आजमावले आहे.
पण इतके दिग्गज सेलिब्रिटीदेखील सलमान एवढी फी आकारू शकले नाहीत. एका मीडिया रिपोर्टनुसार, आतापर्यंत या कलाकारांकडून १ कोटी व त्या आसपासची रक्कम एका भागासाठी आकारण्यात आली होती. पण, हा सलमान खानने मानधनाचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, मागील वर्षी सलमान खानने 'बिग बॉस १६' साठी एकूण १००० करोड रुपये इतके मानधन आकारलं होतं. या बाबतीत एका मुलाखतीत सलमानने स्वतः सांगितलं होते. 'सियासत' आणि 'टेलीचक्कर'च्या अहवालात सलमान खान 'बिग बॉस ओटीटी सीझन २'चे सूत्रसंचालन करण्यासाठी एका आठवड्याला २५ करोड घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. ही गोष्ट खरी ठरल्यास सलमान एका भागासाठी जवळ-जवळ १२.५० कोटी रुपये इतके मानधन आकारणार आहे. या रक्कमेसोबत टेलिव्हिजनवर सर्वात जास्त परडे घेणारा तो पहिला भारतीय अभिनेता आहे. 'बिग बॉस' शो साठी सलमानच्या मानधनातील आकडा दरवर्षी हा वाढताच असतो.
कोण आहे टेलिव्हीजनवर सर्वाधिक परडे घेणारी अभिनेत्री?
'बिग बॉस' हा एक रिॲलिटी शो असून त्याची काल्पनिक (Fictional) शो सोबत तुलना करणे योग्य ठरणार नाही. टेलिव्हीजन क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेत्रींपैकी रुपाली गांगुली सर्वात अधिक परडे घेणारी अभिनेत्री आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या एका वृत्तानुसार 'अनुपमा' म्हणजेच रुपाली गांगुली एका भागासाठी ३ लाख रुपये इतके मानधन आकारते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.