Bobby Darling Viral Video: मेट्रोत बॉबी डार्लिंगनं तरुणाला धू धू धू धूतलं...; नेमकं काय घडलं? पाहा व्हायरल VIDEO

Bobby Darling News: सध्या सोशल मीडियावर बॉबी डार्लिंगचा आणि एका तरुणाचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांची ही मेट्रोतली मारामारी प्रचंड चर्चेत आली आहे.
Bobby Darling Viral Video
Bobby Darling Viral VideoInstagram
Published On

Bobby Darling Viral Video

सध्या सोशल मीडियावर दिल्ली मेट्रो प्रचंड चर्चेत आहे. कधी मेट्रोतील डान्सचा व्हिडीओ समोर येतोय तर कधी मेट्रोतल्या हाणामारीचा व्हिडीओ समोर येतोय. अशातच सध्या सोशल मीडियावर दिल्ली मेट्रोतील आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक बॉलिवूडमधील अभिनेत्री दिसून येत आहे. ही दुसरी तिसरी कोणी नसून बॉबी डार्लिंग आहे. त्या व्हायरल व्हिडीओमध्ये ती एका तरुणाला मारताना दिसते. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Bobby Darling Viral Video
Tiger 3 Trailer Date Announcement: टीझरनंतर आता ट्रेलर येणार,‘टायगर ३’च्या बहुचर्चित ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीख आली समोर

बिग बॉसच्या पहिल्या सीझनमधून बॉबी डार्लिंग चर्चेत आली होती. आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सध्या फ्री स्टाईल हाणामारीमुळे चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर बॉबी डार्लिंगचा दिल्ली मेट्रोतील एका व्यक्तीसोबत भांडतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर दोघांमध्ये जोरदार भांडण आणि शिवीगाळ होताना दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये बॉबी त्या पुरुषासोबत गैरवर्तन करताना दिसतेय.

पुढे या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत, दोघांचे भांडण सोडवण्यासाठी एक सीआयएसएफ जवान सुद्धा येतात. बॉबीच्या हातात एक पांढरी बॅग दिसते. ही बॅग तो प्रवाशी ओढताना दिसून येत आहे. त्यानंतर हे दोघेही जोरदार भांडण करत एकमेकांना शिविगाळ आणि मारहान करताना दिसून येत आहे. त्यांच्या ह्या भांडणामध्ये सीआयएसएफ जवान मध्यस्थी करून भांडण थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही ते एकमेकांना शिविगाळ करताना दिसून येत आहे. (Viral Video)

Bobby Darling Viral Video
Gaurav More: फिल्टर पाड्याच्या बच्चनला DDLJ चा फीवर; लंडनमध्ये किंग खानच्या गाण्यावर गौरव मोरेचा अफलातून डान्स

या व्हायरल व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले असून नेटकऱ्यांनी दोघांचीही प्रचंड खिल्ली उडवली आहे. ‘तडका बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम चॅनलवरुन हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. (Entertainment News)

Bobby Darling Viral Video
Jawan Collection Creates History: किंग खानच्या ‘जवान’ने पुन्हा रचला इतिहास, ११०० कोटींपार जगभरात कमाई करणारा ठरला पहिला हिंदी चित्रपट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com