Priyadarshini Indalkar Post Instagram
मनोरंजन बातम्या

Priyadarshini Indalkar Post: प्रियदर्शनीचा “सावित्रीची लेक” पुरस्काराने सन्मान; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘हास्यजत्रेच्या पुण्याईमुळे असे पुरस्कार...’

Priyadarshini Indalkar News: प्रियदर्शनीला ३ जानेवारी रोजी सावित्रिबाई फुले यांच्या जयंती दिवशी “सावित्रीची लेक २०२४” पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.

Chetan Bodke

Priyadarshini Indalkar Post

हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने फार कमी दिवसांत सोशल मीडियावर तिने आपला चाहतावर्ग तयार केला आहे. प्रियदर्शनीने चित्रपट आणि वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. प्रियदर्शनीला नुकतंच “सावित्रीची लेक २०२४” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. अभिनेत्रीने याबद्दलची माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. या पुरस्कारामुळे तिचं कौतुक होत आहे. (Marathi Actress)

प्रियदर्शनी आपल्या पोस्टमध्ये बोलते, “व्हयं, मी सवित्रीची लेक!”

“३ जानेवारीला क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त, ज्ञान Foundation कडून मला “सावित्रीची लेक २०२४” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सोनाली कुलकर्णीच्या पोस्ट वरुन प्रेरणा घेऊन, हा पुरस्कार स्विकारताना, मी सावित्रीबाईंची चिरी लावून गेले, आणि ताईने लिहीलेल्या ओळी देखील मनोगतात व्यक्त केल्या.”

“स्वतःला “सावित्रीची लेक” म्हणवुन घेताना ही चिरी माझ्यातल्या स्वाभिमानाला आणखीन प्रोत्साहन देत होती. श्रीपाल सबनीस, मनोहर कोलते यांचे मनापासून आभार! हास्यजत्रेमुळे मी घराघरात पोहोचते आहे, आणि हास्यजत्रेच्या पुण्याईमुळे असे पुरस्कार माझ्या पदरी पडत आहेत.”

आणि पुढे सचिन मोटे, सचिन गोस्वामी, अमित फाळकेंचे आभार मानले आहेत.

प्रियदर्शनीच्या कामाबद्दल बोलायचे तर, प्रियदर्शनीचा आणि क्षितीज दातेचा ‘नवरदेव BSc. Agri.’ हा चित्रपट येत्या २६ जानेवारीला रिलीज होणार आहे. शेतीचं उत्तम शिक्षण घेतलेल्या महत्त्वाकांक्षी तरूणाला लग्नाची जमवाजमव करताना कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याची कथा चित्रपटातून आपल्याला बघायला मिळणार आहे.

चित्रपटामध्ये क्षितीश दाते आणि प्रियदर्शनी सोबत मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक अशा उत्तम कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तोडा-फोडा राज्य करा, ही यांची निती - ठाकरे

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Metro In Dino Cast Fees: रोमँटिक म्युझिकल ड्रामा 'मेट्रो इन डिनो' चित्रपटातील कलाकारांचे मानधन किती?

SCROLL FOR NEXT