Savitribai Phule Jayanti : पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची आज जयंती, जाणून घेऊया त्यांच्याविषयी थोडक्यात
Savitribai Phule Jyanti In Marathi :
आज भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणासाठी आपले आयुष्य वाहून घेतलेल्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव या छोट्या गावात झाला.
यांचा जन्म दलित कुटुंबात झाला होता. भारताच्या स्त्री शिक्षणाची (Education) गंगोत्री म्हणून ओळखल्या जातात. त्या पहिल्या मुख्यध्यापिका होत्या. स्त्री स्वातंत्र्य नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाई (Savitribai Phule) यांचा जन्म झाला. त्यांचा विवाह १३ वर्षाच्या असताना महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला.
1. सावित्रीबाई फुले यांच्या विषयीच्या खास काही गोष्टी
सावित्रीबाई या भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या. त्यांनी महात्मा फुले यांच्यासोबत महिलांचे (Women) अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी त्यांचे जीवन महिला सक्षमीकरणासाठी समर्पित होते.
2. जाणून घेऊया त्यांचे प्रेरणादायी विचार
शिक्षण स्वर्गाचे दरवाजे उघडते, स्वतःला जाणून घेण्याची संधी देते.
तुम्हाला कोणी कमकुवत समजण्याआधी तुम्हाला शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यावे लागेल.
स्वाभिमानाने जगण्यासाठी अभ्यास करा, शिक्षण हेच माणसाचे खरे भूषण आहे.
स्त्रिया केवळ स्वयंपाकघर आणि शेतात काम करण्यासाठी बनलेल्या नाहीत, त्या पुरुषांपेक्षा चांगले काम करू शकतात.
देशात स्त्री साक्षरतेचा फार मोठा अभाव आहे कारण इथल्या स्त्रियांना कधीच बंधनातून मुक्त होऊ दिले नाही.
कोणत्याही समाजाची किंवा देशाची प्रगती तेथील स्त्रिया शिक्षित झाल्याशिवाय अशक्य आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.