अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा आज १० वा स्मृतिदिन आहे. २० ऑगस्ट २०१३ रोजी दोन अज्ञात इसमांनी गोळ्या घालून त्यांचा खून केला होता. दाभोलकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त राजकीय मंडळींसह, काही सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. नुकतंच मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पोस्ट शेअर केली आहे. १० वर्षे झाली पण वेदना अजूनही ताजीच आहे, असं म्हणत अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
सोनाली कुलकर्णी पोस्ट शेअर करत म्हणते, १० वर्षं झाली, वेदना ताजीच आहे अजून... अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्द ऐकून काहीजण दुखावतात. दुसऱ्या माणसांची, राज्यांची, धर्मांची अंधश्रद्धा दिसत नाही का असं म्हणतात... दिसते ना... दिसतेच... पण आपल्याला जर कोणी चेतावणी देत असेल की पूर येणार आहे.. किंवा भूकंप होणार आहे.. तर आपण स्वतःला वाचवू- की सांगणाऱ्यावरच चिडू- तू शेजारच्या गावाला सांग आधी म्हणून..? (Actress)
आपल्या पोस्टमध्ये पुढे अभिनेत्री म्हणते, शहाणं होणं हा पर्याय आहे आपल्यासमोर.. तो निवडूया. आपल्या देवावरच्या विश्वासाला कोणीही नाकारू शकत नाही. तो आपला हक्क आहे. पण त्यापायी होणारी पिळवणूक आणि सोयीस्करपणा दोन्ही घातक आहेत ह्याची जाणीव ठेवूनच पुढचं पाऊल उचलूया.. डॅा. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.. अशा आशयाची पोस्ट सोनाली कुलकर्णीने शेअर केली आहे. (Entertainment News)
दाभोळकरांची हत्या कशी झाली?
डॉ. नरेंद्र दाभोळकर कायमच अंधेश्रद्धेविरुद्ध आवाज उठवायचे. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात मॉर्निंग वॉकवरून घरी जात असताना, मागून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दाभोळकरांची पुण्यातील विठ्ठल रामजी पुलावर हत्या झाली होती. त्यांच्या हत्येमुळे राज्य हादरलं होतं. दाभोळकरांच्या हत्येचा खटला पुण्यातल्या विशेष सीबीआय न्यायालयात सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.