Gaurav More Interview Instagram
मनोरंजन बातम्या

Gaurav More On Hairstyle: 'मी मनावर दगड ठेवून हे केलं', गौरव मोरेनं सांगितलं केस कापण्यामागचं खरं कारण

Gaurav More Movie: गौरव त्याचा आगामी चित्रपट 'बॉयज ४'च्या प्रमोशनमध्ये बिजी आहे.

Pooja Dange

Gaurav More Spoke About His New Look:

फिल्टर पाडा फेम अभिनेता गौरव मोरेने चित्रपटांमध्ये पदार्पण केले आहे. सध्या गौरव त्याचा आगामी चित्रपट 'बॉयज ४'च्या प्रमोशनमध्ये बिजी आहे. 'बॉयज ४'च्या संपूर्ण टीमने साम टीव्हीला मुलखात दिली आहे. या मुलाखतीत गौरवने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे अनेक किस्से शेअर केले आहेत.

दरम्यान या मुलाखतीत गौरव मोरेला त्याने केस का कापले? हा प्रश्न देखील विचारण्यात आला. इतके दिवस आपण सर्वजण गौरवने केस का कापले? याविषयी फक्त अंदाज बांधत होते. पण गौरव मोरेने केस का कापले, याचं उत्तर अखेर खुद्द फिल्टर पाड्याच्या बच्चनने दिलं आहे.

फिल्टर पाड्याचा बच्चन गौरव मोरेने केस कापल्याचं कळताच त्याच्या चाहत्यांना आणि सहकालकरांना धक्का बसला. प्रत्येकजण त्याने केस का कापले असतील याचा तर्क लढवू लागला. आता गौरवने स्वतः या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत गौरव मोरेने या प्रश्नाचं उत्तर देत म्हणाला की, 'मी एक चित्रपट करतोय 'महापरिनिर्वाण' नावाचा. या चित्रपटामध्ये १९५०-१९५६ चा काळ दाखविण्यात आला आहे. त्यासाठी मी छतीवर, डोक्यावर आणि केसावर दगड ठेवून केस कापले. केस कापल्यानंतर मी आठवडाभर नाराज होतो. पण आता शूट संपत आलं आहे. आता मी पुन्हा माझ्या ओरिजनल स्टाईलवर येणार आहे. आता मी माझी ती हेअर स्टाईल पुन्हा करेन. मी पण मिस करतोय माझ्या केसांना.'

गौरव मोरेच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं तर त्याचा 'अंकुश' चित्रपट काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाला. आता त्याचा 'बॉयज ४' हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. मराठीसह आता गौरव हिंदी चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे. महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून गौरव आपल्या भेटीला येतच असतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT