Shivali Parab Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shivali Parab Video : 'धडक धडक मेरा दिल डोला...'; कल्याणच्या चुलबुलीचा जबरदस्त डान्स

Shivali Parab Dance Video : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री शिवाली परबने इन्स्टाग्रामवर सुंदर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Shreya Maskar

कॉमेडी क्वीन शिवाली परब 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. तिला सर्वजण कल्याणच्या चुलबुली या नावाने ओळखतात. तिने आपल्या कॉमेडीने जगाला हसवले आहे. शिवालीने आपल्या अभिनयाचे चाहत्यांना वेड लावले आहे. शिवाली परब सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या विविध लूकचे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करते. चाहते देखील शिवालीला भरभरून प्रेम करतात.

मराठी अभिनेत्री शिवाली परबने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक डान्स रील शेअर केली आहे. तिने 'रूखी सूखी रोटी' या गाण्यावर शेतात भन्नाट डान्स केला आहे. डान्समधील तिच्या कातिल अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत. ती शेतात एका झाडाखाली डान्स करताना दिसत आहे. 'रूखी सूखी रोटी' हे गाणे 2001 साली रिलीज झालेल्या 'नायक' चित्रपटातील आहे. या गाण्यात बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री राणी मुखर्जी झळकले आहेत.

शिवालीचा लूक

डान्ससाठी शिवालीने छान पारंपरिक लूक केला आहे. तिने सुंदर घागरा चोळी परिधान केली आहे. केशरी रंगाचा ब्लाउज आणि जांभळ्या रंगाचा घागरा तिने घातला आहे. मोकळे केस, मिनिमल मेकअप, मोत्याचे दागिने, हातात बांगड्या घालून तिने हा लूक पू्र्ण केला आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूपच सुंदर दिसत आहेत.

कमेंट्सचा वर्षाव

शिवाली परबच्या या डान्स व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. कमेंटमध्ये तिला नेटकरी क्यूट, ब्युटीफूल, मस्तच अशा कमेंट मिळत आहेत. शिवालीने या डान्स व्हिडीओला एक हटके कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "धडक धडक मेरा दिल डोला..."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धाराशिवमध्ये मराठा कार्यकर्त्यांचा मंत्री प्रताप सरनाईकांना घेराव; नेमकं काय घडलं? VIDEO

Shah Rukh Khan injured: शाहरुखसह हे सेलिब्रिटीही झाले होते शुटिंगदरम्यान गंभीर जखमी

Maharashtra Politics: अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? काही ठळक मुद्द्यांवरून जाणून घ्या तथ्य

Crime : मी अजून सहन करु शकत नाही...; विद्यार्थिनीने वसतिगृहात स्वत:ला संपवलं, सुसाईट नोटमध्ये लिहिलं...

Solapur Crime: १० वर्षांच्या मुलाच्या अपहरण करून हत्या, कालव्यात आढळला मृतदेह; सोलापूर हादरले

SCROLL FOR NEXT