Rono Mukherjee : राणी मुखर्जी अन् काजोलवर कोसळला दुःखाचा डोंगर, रोनो मुखर्जी यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा

Rono Mukherjee Passed Away : राणी मुखर्जी, काजोल यांचे काका रोनो मुखर्जी यांचे निधन झाले आहे. मुखर्जी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Rono Mukherjee Passed Away
Rono MukherjeeSAAM TV
Published On

Rono Mukherjee Passed Away: दिग्गज चित्रपट दिग्दर्शक रोनो मुखर्जी (Rono Mukherjee) यांचे निधन झाले आहे. याच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. रोनो मुखर्जी (Rono Mukherjee Passed Away) हे राणी मुखर्जी (Rani Mukerji), काजोल (Kajol) चे काका होते. त्यामुळे मुखर्जी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रोनो मुखर्जी हे बॉलिवूड अभिनेत्री शर्बानी मुखर्जी यांचे वडील होते.

रोनो मुखर्जी (Rono Mukherjee Death) यांनी वयाच्या 83 वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांचे 28 मे रोजी मुंबईत निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही आहे.

रोनो मुखर्जी यांचे राणी मुखर्जी आणि कोजलसोबत नातं

रोनो मुखर्जी यांच्या निधनाची बातमी समजताच मुखर्जी कुटुंबानी त्यांच्या घरी धाव घेतली. अयान मुखर्जी आणि तनिषा यांनी काकांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली. बॉलिवूडचे अनेक कलाकार रोनो मुखर्जी यांच्या घरी गेले. रोनो मुखर्जी हे काजोल आणि राणी मुखर्जीचे काका होते. रोनो मुखर्जी हे बॉलिवूड अभिनेत्री काजोलचे वडील शोमू मुखर्जी यांचे भाऊ होते.

रोनो मुखर्जी करिअर

रोनो मुखर्जी यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. रोनो मुखर्जी यांनी 'हैवान' चित्रपटाचे आणि 'तू ही मेरी जिंदगी' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजले.

Rono Mukherjee Passed Away
Aishwarya Rai Bachchan : आईसारखीच दिसते लेक आराध्या; ऐश्वर्या रायचा बालपणीचा PHOTO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com