Shruti Kadam
मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर बर्फ रगडल्याने त्वचेतील छिद्र बंद होतात, ज्यामुळे मेकअप अधिक काळ टिकतो.
मेकअपपूर्वी क्ले मास्क लावल्याने त्वचेतील अतिरिक्त तेल शोषले जाते, ज्यामुळे मेकअप लवकर निघत नाही.
हलका मॉइश्चरायझर वापरल्याने त्वचा हायड्रेट राहते आणि मेकअप चांगल्या प्रकारे बसतो.
उन्हाळ्यात सनस्क्रीन लावल्याने त्वचा यूव्ही किरणांपासून सुरक्षित राहते आणि मेकअपही टिकतो
प्राइमर लावल्याने मेकअपची बेस चांगली तयार होते आणि मेकअप दीर्घकाळ टिकतो.
उन्हाळ्यात पावडर मेकअप टाळावा आणि लिक्विड किंवा मॅट फिनिश प्रॉडक्ट्सचा वापर करावा, ज्यामुळे मेकअप टिकतो.
मेकअप पूर्ण केल्यानंतर सेटिंग स्प्रेचा वापर केल्याने मेकअप सेट राहतो आणि लवकर निघत नाही.