Shruti Kadam
ही साडी पश्चिम बंगालमधील खासियत आहे. ती हलकी, मऊ आणि उन्हाळ्यासाठी अत्यंत आरामदायक असते. यामध्ये पारंपरिक जरी बॉर्डर आणि फ्लोरल प्रिंट असतात.
तमिळनाडूमधील चेट्टीनाड भागातील ही साडी गडद रंग आणि मोठ्या बॉर्डरसाठी ओळखली जाते. या साड्या खूप मजबूत आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या असतात.
मध्य प्रदेशातील चंद्रेरी गावातून तयार होणारी ही साडी कापूस आणि रेशीम यांच्या मिश्रणातून बनते. ती खूप हलकी आणि राजेशाही दिसणारी असते.
ही मध्य प्रदेशातील महेश्वर गावातील पारंपरिक साडी असून ती कॉटन आणि रेशीम मिश्रित असते. तिची बॉर्डर आणि पल्ला खास हाताने विणलेले असतात.
बंगालमधील कांथा भरतकामामुळे प्रसिद्ध असलेल्या या साड्यांवर हस्तशिल्पी कढकाम केलेले असते. त्या पारंपरिक आणि कलात्मक असतात.
तेलंगणामधील पोचमपल्ली गावातून बनणाऱ्या या साड्यांमध्ये इकत तंत्राचा वापर केला जातो. रंगीत डिझाईन्स आणि जिओमेट्रिक पॅटर्न्स हे तिचे वैशिष्ट्य आहे.
ओडिशातील आदिवासी भागातील ही साडी वनस्पती रंगांनी रंगवली जाते. ती हाताने विणलेली असून पर्यावरणपूरक साडी मानली जाते.