Maharashtra Shaheer Teaser And Poster Launch By Maharashtra CM Instagram/ @kedaarshinde
मनोरंजन बातम्या

Maharashtra Shaheer: फडकेल नव्याने भगवा, महाराष्ट्र पुन्हा गर्जेल... मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'महाराष्ट्र शाहीर'च्या टीझरचे अनावरण

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येत्या २८ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या 'महाराष्ट्र शाहीर' या मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले.

Chetan Bodke

Maharashtra Shaheer Teaser And Poster Launch By Maharashtra CM: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी येत्या २८ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या 'महाराष्ट्र शाहीर' या मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित केले. शाहीर साबळे यांच्यावरील बायोपिक ही काळाची गरज असून राज्याच्या इतिहास आणि संस्कृतीसाठी ही महत्त्वाची भूमिका सिद्ध करेल, असे शिंदे म्हणाले. त्यांनी यावेळी चित्रपटासाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत.

शाहीर साबळे यांनी लिहिलेल्या आणि नुकतेच महाराष्ट्राचे अधिकृत राज्यगीत घोषित करण्यात आलेल्या 'जय जय महाराष्ट्र माझा…' या गाण्याची पार्श्वभूमी पोस्टरला आहे.पोस्टरमध्ये उंचावलेली हाताची मुठ विविध सामाजिक-राजकीय चळवळींमध्ये कार्यकर्त्यांचा सहभाग आणि जागृतीचे आवाहन दर्शवते.

पोस्टरमध्ये शाहीर साबळेंच्या भूमिकेत असलेल्या अंकुश चौधरीचा विशेष शाहीरी बाणा दिसतोय. वेगळ्या अंदाजातील हे पोस्टर अल्पावधित लोकप्रिय झालय.अनेक दशकांपूर्वी शाहीरांनी गायलेल्या 'जय जय महाराष्ट्र माझा' या गाण्याला राज्य सरकारने नुकताच राज्यगीताचा दर्जा दिला आहे. ही शाहीर साबळेंसारख्या महान कलाकाराला वाहिलेली आदरांजली मानली जातेय.

चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदेंनी सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर शेअर करताना लिहिले की, फडकेल नव्याने भगवा.. महाराष्ट्र पुन्हा गर्जेल.. जनतेचा बुलंद आवाज.. लेखणीतूनी बरसेल.. देऊनी डफावर थाप.. ललकारत होते जाहीर.. अर्पितो तुम्हाला तुमचे.. तुमचाच.. महाराष्ट्र शाहीर.. शाहीर साबळे ह्यांची भव्य जीवनगाथा २८ एप्रिल २०२३ पासून तुमच्या नजीकच्या चित्रपटगृहात..

शाहीर साबळे हे प्रसिद्ध नाटककार, कवी, गायक आणि कलाकार होते. त्यांच्या जीवनावर आधारित हा बायोपिक 28 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटाची सध्या जोरात चर्चा होत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर झालेल्या या कार्यक्रमाला चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता अंकुश चौधरी, निर्माते संजय छाब्रिया, निर्माती बेला शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेही उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT