Vastraharan Drama: मच्छिन्द्र कांबळी यांचे 'वस्त्रहरण' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ४४ व्या वर्षांनिमित्त रसिक प्रेक्षकांना खास भेट

"वस्त्रहरण" ही अजरामर कलाकृती येत्या १६ फेब्रुवारी रोजी ४४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
Vastraharan
Vastraharan Saam TV

Special Show Of Vastraharan: 'वस्त्रहरण' शब्द ऐकताच आपल्याला आठवतात कै. मच्छिन्द्र कांबळी. या अवलियाने महाराष्ट्रातील नाही तर जगतातील प्रेक्षकांना 'वस्त्रहरण'ची ओळख करून दिली. दशावतारी नाटके, शिमग्यातील खेळे, सोंगे, भारुडे अशा पारंपरिक गोष्टी सर्वांना नव्याने समजल्या.

कोकणात जन्मलेल्या एका मालवणी भाषिक माणसाने मालवणी बोलीभाषेतून “वस्त्रहरण” हे नवंकोर नाटक रंगभूमीवर आणले. तसेच रंगमंच आणि रसिकांसाठी मनोरंजनाचे आगळेवेगळे नवे दालन उघडे केले.

Vastraharan
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: जेठालाल येतेय दयाबेनची आठवण; म्हणाला दिशा आणि टपूमुळे खूपच...

१६ फेब्रुवारी १९८० साली कै. मच्छिन्द्र कांबळी यांनी "वस्त्रहरण" या नाटकाचा पहिला प्रयोग केला. व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडविलेली "वस्त्रहरण" ही अजरामर कलाकृती येत्या १६ फेब्रुवारी रोजी ४४ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.

त्यानिमित्ताने भद्रकाली प्रॉडक्शन्स सेलिब्रेटी कलाकारांच्या संचात रंगमंचावर ४४ मोजकेच प्रयोग सादर करणार आहे. लवकरच प्रयोग क्र. ५२५५ रसिक प्रेक्षकांच्या समोर सादर होणार असल्याचे प्रसाद कांबळी यांनी सांगितले.

४४ व्या वर्षानिमित्त सादर होणाऱ्या या प्रयोगामध्ये अनेक दिग्गज मराठी कलाकार सहभागी झाले आहेत. यात दीपाली सय्यद, दिगम्बर पाटकर, आनंद इंगळे, सुशांत शेलार, पुष्कर श्रोत्री, विशाखा सुभेदार अशाच एकापेक्षा एक विनोदवीरांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com