Rakhi Sawant: राखीच्या मदतीला राजकीय पक्ष, आदिल विरोधात ओशिवरा पोलीस ठाण्यासमोर करणार आंदोलन

राखीच्या मदतीला आदिल प्रकरणात 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' हा पक्ष धावून आले आहे.
Rakhi Sawant-Adil Khan Marriage Controversy
Rakhi Sawant-Adil Khan Marriage Controversy Instagram @rakhisawant2511

Rakhi Sawant Help By RPI: बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान दुर्रानी यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दिवसेंदिवस यांच्यातील वाद कमी होण्याचे नाव घेत नाही.

आदिल विरोधात मुंबईसह म्हैसुरमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्याच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होतच चालली आहे. आता या प्रकरणात राखीच्या मदतीसाठी एक राजकीय पक्ष देखील धावून आला आहे.

Rakhi Sawant-Adil Khan Marriage Controversy
Rakhi Sawant: 'आदिलला घटस्फोट देणार नाही कारण...' म्हणत राखीने केले धक्कादायक खुलासे, न्यायालयासमोर फोडला हंबरडा

राखीच्या मदतीला आदिल प्रकरणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) पक्ष धावून आला आहे. लग्नानंतर आदिलने अभिनेत्री राखी सावंतवर अत्याचार आणि घोर अन्याय केल्याच्या निषेधार्थ आज आंदोलन करण्यात येणार आहे. आरपीआयच्या वतीने ओशिवरा पोलीस ठाण्यात आरोपी आदिल खान विरोधात दुपारी तीन वाजता तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.

Rakhi Sawant-Adil Khan Marriage Controversy
'Bigg Boss 16'च्या मंडळींसाठी खास पार्टीचे आयोजन, 'या' जोडीचा व्हिडिओ पाहून नेटकरी अचंबित

सुप्रसिध्द अभिनेत्री राखी सावंत आरपीआय पक्षाची महिला आघाडीच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा आहे. राखी बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर येताच तिने सर्वात आधी आपल्या लग्नाची गुडन्यूज दिली तर, त्यानंतर आपल्या आईच्या आजारपणाची बातमी तिने दिली होती.

यावेळी राखीच्या मदतीसाठी आदिलने बरीच मदत केली होती. पण काही काळानंतर त्या दोघांमधील वाद बरेच विकोपाला गेले. मात्र कौटुंबिक हिंसाचार, मारहाण, अत्याचार आणि अन्याय केल्याच्या आरोपाखाली राखीने आदिल विरोधात पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

Rakhi Sawant-Adil Khan Marriage Controversy
Vastraharan Drama: मच्छिन्द्र कांबळी यांचे 'वस्त्रहरण' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ४४ व्या वर्षांनिमित्त रसिक प्रेक्षकांना खास भेट

राखीने २०१४ मध्ये आरपीआय पक्षात प्रवेश केला होता. आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत राखीने पक्षप्रवेश केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com