Horror - Comedy Universe Google
मनोरंजन बातम्या

Horror - Comedy Universe : 'स्त्री 2' नंतर हॉरर कॉमेडी युनिव्हर्सच्या 8 चित्रपटांची घोषणा, यावर्षी होणार 'हे' दोन चित्रपट प्रदर्शित

Horror - Comedy Universe Movie : मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्सच्या 8 चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. यामधील चित्रपटांपैकी 3 सिक्वेल आणि 5 नवीन हॉरर चित्रपट आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Horror-Comedy Universe : 'स्त्री 2' आणि 'मुंज्या' सारख्या चित्रपटांनी 2024 साली बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कलेक्शन करत प्रेक्षकांची पसंती मिळवली. या चित्रपटांच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये देखील युनिव्हर्स तयार करण्याचा विचार निर्माते करत आहेत. इतर कोणत्याही चित्रपट निर्मात्याने याचा विचार करण्यापूर्वी 'स्त्री'चे निर्माते दिनेश विजन यांनी 8 हॉरर चित्रपटांसह प्रेक्षकांना खूप करण्याचा विचार केला आहे. त्याने त्याच्या मॅडॉक फिल्म्स बॅनरखाली 8 नवीन चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे.

प्रॉडक्शन हाऊसने 2025 ते 2028 पर्यंत दरवर्षी दोन चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. 8 नवीन चित्रपट आणि त्यांच्या प्रदर्शनाच्या तारखा सोशल मीडिया पोस्टमध्ये जाहीर करण्यात आल्या आहेत. 2024 मध्ये, मॅडॉक फिल्म्सने 'स्त्री 2', मुंज्या आणि तेरी बातों में ऐसा उल्झा जिया सारखे मेगा-ब्लॉकबस्टर चित्रपट प्रदर्शित केले होते.

हे चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार

मॅडॉक फिल्म्स येत्या चार वर्षांत 8 हॉरर-कॉमेडी आणि नवनवीन चित्रपट घेऊन येत आहे, ज्याची रिलीज डेट नुकतीच प्रोडक्शन हाऊसने जाहीर केली आहे. 2025 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर आयुष्मान खुरानाचा 'थामा' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'शक्ती शालिनी' हा चित्रपट ३१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

हे दोन चित्रपट 2026 मध्ये होणार प्रदर्शित

वरुण धवन स्टारर 'भेडिया' या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. आता या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली आहे. 'भेडिया 2' पुढील वर्षी 14 ऑगस्ट 2026 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. तर, 'चामुंडा' हा चित्रपट ४ डिसेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'स्त्री 3' साठी 2 वर्षे वाट पाहावी लागणार

'स्त्री' आणि 'स्त्री 2'च्या यशानंतर आता निर्मात्यांनी 'स्त्री 3'ची घोषणा केली आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या चित्रपटाचा तिसरा सिक्वेल 13 ऑगस्ट 2027 रोजी रिलीज होणार आहे. शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांचा हिट 'मुंज्या' चित्रपटाचा 'महा मुंज्या' हा सिक्वेल 24 डिसेंबर 2027 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हे दोन चित्रपट 2028 मध्ये होणार प्रदर्शित

मॅडॉक फिल्म्स 2028 मध्ये दोन उत्कृष्ट चित्रपट घेऊन येत आहेत. 'वर्ल्ड वॉर' हा चित्रपट 11 ऑगस्ट 2028 रोजी प्रदर्शित होणार आहे. 18 ऑक्टोबरला 'सेकंड वर्ल्ड वॉर'ही पडद्यावर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lonavala-Khandala Tourism: 'या' विकेंडला मस्त भिजायचंय? लोणावळा-खंडाळ्यातील 'या' धबधब्यांची नाव आताच नोट करा

Shefali Jariwala Property: शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती किती? वारसदार कोण?

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Sri Krishna Janmbhoomi Mathura: ईदगाह 'वादग्रस्त वास्तू' नाहीये; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Shocking : शेतात गेले ते परत आलेच नाहीत; आधी वडिलांनी स्वतःला संपवलं, त्यांना बघून मुलानंही मृत्यूला कवटाळलं

SCROLL FOR NEXT