Sachin Pilgaonkar : आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या 'स्थळ' चित्रपटाद्वारे सचिन पिळगावकर यांचे चित्रपट प्रस्तुतीत पदार्पण

Sachin Pilgaonkar Movie : सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त 'स्थळ' चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडीयावर लाँच करण्यात आले. या चित्रपटाची प्रस्तुती अभिनेते दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी केली आहे.
Sachin pilgaonkar Sthal Movie
Sachin pilgaonkar Sthal MovieSaam Tv
Published On

Sachin Pilgaonkar : अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये अभिनय, चित्रपटांचे दिग्दर्शन, गायन अशी पाच दशकांपेक्षा अधिक मोठी, बहुरंगी कारकिर्द गाजवणारे सचिन पिळगावकर आता नव्या वर्षात नवी इनिंग सुरू करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या धुन प्रॉडक्शन निर्मित आणि जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित "स्थळ" या बहुचर्चित चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिळगावकर करणार असून, महिला दिनाच्या औचित्याने ७ मार्चला "स्थळ" हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त "स्थळ" चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. शेफाली भूषण, करण ग्रोवर, रिगा मल्होत्रा आणि जयंत दिगंबर सोमलकर यांनी "स्थळ" या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नंदिनी चिकटे, तारानाथ खिरटकर, संगीता सोनेकर, सुयोग ढवस, संदीप सोमलकर, संदीप पारखी, स्वाती उलमले, गौरी बदकी, मानसी पवार या नव्या दमाच्या कलाकारांचा अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे. दिग्दर्शक जयंत दिगंबर सोमलकर यांनी शॉर्ट फिल्म्ससह ‘गिल्टी माईंड्स’ या गाजलेल्या वेब सीरिजचं सहदिग्दर्शन केलं होतं.

Sachin pilgaonkar Sthal Movie
Alia - Ranbir : आलिया आणि रणबीरच्या प्रेमाची जादू , राहाच्या क्यूट स्टाइलने जिंकली मनं ! पहा Photo

"स्थळ" हा त्यांचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर झाला आणि तिथे त्याला सर्वश्रेष्ठ आशिया पॅसिफिक फिल्मसाठी NETPAC अवॉर्ड सुद्धा मिळाला. त्यानंतर तब्बल २९ महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट दाखवला गेला आहे आणि १६ पेक्षा जास्त पुरस्कारही पटकावले आहेत. त्यामुळेच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाविषयी उत्सुकता आहे.

Sachin pilgaonkar Sthal Movie
Ankita Walawalkar : 'माझं नाव वापरलेलं मला आवडणार...' ; त्या पोस्टवरून चिडली कोकण हार्टेड गर्ल, वाचा काय आहे प्रकरण ?

या चित्रपटाबद्दल बोलताना सचिन पिळगावकर म्हणाले, श्रियाने मामी फेस्टिवल मध्ये हा चित्रपट पाहिले होता. खास श्रियाच्या आग्रहास्तव अमेरिकेत "नाफा" फिल्म फेस्टिवल मध्ये मी आणि सुप्रियाने "स्थळ" हा चित्रपट पाहिला. त्यावेळीच हा चित्रपट आम्हा दोघांनाही प्रचंड आवडला होता.महाराष्ट्रातील मातीत रूजलेल्या या चित्रपटाला अमेरिकेच्या मराठी लोकांनी डोक्यावर घेतलेले पाहून, चित्रपट प्रदर्शित करताना काही मदत लागल्यास आवर्जून सांगा असे निर्माता, दिग्दर्शक जयंत सोमलकर यांना आम्ही सांगितले. "स्थळ" चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी मला चित्रपटाची प्रस्तुती करण्यास विचारले आणि मी लगेच होकर दिला. चांगली संहिता ही रसिक प्रेक्षकांपर्यंत अवश्य पोहचली पाहिजे यासाठी मी या चित्रपटाची प्रस्तुती करण्याचे ठरविले मी ठरवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com