Lock Upp 2 saam tv
मनोरंजन बातम्या

Lock Upp 2 : रितेश देशमुखच्या नव्या शोमध्ये कोण-कोण दिसणार? प्रणित मोरे, शिल्पा शिंदेसह 'या' सेलिब्रिटींच्या नावाची चर्चा

Lock Upp 2 - Contestants List : रितेश देशमुख लवकरच 'लॉक अप २' घेऊन येत आहे. या रिॲलिटी शोमध्ये कोण-कोणते कलाकार झळकणार, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'लॉक अप २'चे होस्टिंग रितेश भाऊ करणार

'लॉक अप २' मध्ये टिव्ही इंडस्ट्रीचे प्रसिद्ध कलाकार झळकणार

'लॉक अप २' साठी प्रणित मोरेच्या नावाची चर्चा

बहुप्रतीक्षित रिॲलिटी शो 'लॉक अप २' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस मराठी होस्ट केल्यानंतर आता महाराष्ट्राचे लाडके रितेश भाऊ 'लॉक अप २' गाजवणार आहे. अलिकडेच या शोचे खास प्रोमो रिलीज झाले आहेत. तरूणाईमध्ये या शोची तुफान क्रेझ पाहायला मिळते. नेमकं या शोमध्ये काय घडणार, कोण-कोणते कलाकार दिसणार सर्व जाणून घेऊयात.

'लॉक अप २' कोण होस्ट करणार?

'लॉक अप २'हा रिॲलिटी शो बॉलिवूड आणि मराठी अभिनेता रितेश देशमुख चित्रपट दिग्दर्शक फराह खानसोबत होस्ट करणार आहे. 'लॉक अप २'ची धमाकेदार झलक पाहायला मिळाली आहे. या शो १४ सेलिब्रिटी पाहायला मिळणार आहेत. तसेच शोमध्ये २ जेल देखील आहेत. 'लॉक अप' च्या पहिल्या सीझनचे होस्टिंग बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत यांनी केले होते. 'लॉक अप' सीझन १ चा विजेता मुनव्वर फारुकी ठरला होता.

'लॉक अप २' साठी कोणत्या कलाकारांच्या नावांची चर्चा

सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चेनुसार, 'लॉक अप २' या शोमध्ये 'स्प्लिट्सव्हिला'चे फेम योगेश रावत आणि आकांक्षा चौधरी तसेच बिग बॉस फेम शिल्पा शिंदे, प्रणित मोरे, प्रियांका शर्मा, विकास गुप्ता, रश्मी देसाई, पुनीत , अर्चना गौतम, उर्वशी ढोलकिया, प्रणित मोरे, आसिम रियाझ, कुशा कपिला आणि हर्षद चोप्रा या कलाकारांच्या नावाची चर्चा पाहायला मिळत आहे. तसेच या नावांमध्ये टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री शिवांगी जोशी आणि प्रसिद्ध अभिनेता राम कपूर झळकणार असल्याचेही बोले जात आहे. बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांची बायको सुनीता आहुजा यांच्या नावांचाही समावेश आहे. रणवीर इलाहाबादिया देखील शोमध्ये दिसू शकतो. मात्र अद्याप स्पर्धकांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली नाही.

'लॉक अप २' कधी पासून सुरू होणार?

'लॉक अप २' हा रिॲलिटी शो २७ जूनपासून सुरू होणार आहे. शनिवार ते बुधवार रात्री ८ वाजता नेटफ्लिक्सवर हा भन्नाट शो पाहायला मिळेल. चाहते या शोसाठी खूपच उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टाची ज्ञानेश कुमारांना नोटीस SIR विरोधातील लढाईला कायदेशीर बळ?

काशी विश्वनाथाच्या कळसाचं सोनं चोरीला? PMO कडे तक्रार,मंदिर प्रशासनानं आरोप फेटाळले

Friday Horoscope: अडकलेली कामं पूर्ण होतील, या 4 राशींच्या नशीबी आज पैसा; वाचा शुक्रवारचं राशीभविष्य

16 ऑक्टोबरला सरकारविरोधात CJPचा तिरंगा मोर्चा, कनॉट प्लेसचं 'जंतरमंतर' होणार

Fact Check: व्हॉट्सअॅपवर 'NO' लिहाल अकाऊंटमधील पैसे गमवाल? छोट्याश्या चुकीमुळे कष्टाचे पैसे घालवून बसाल?

SCROLL FOR NEXT