Asha Bhosale Saam Tv
मनोरंजन बातम्या

Asha Bhosale Funeral: सूर सम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Asha Bhosale Death: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर दादरच्या शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सिनेसृष्टीतील कलाकार, राजकीय नेते आले होते.

Priya More

Summary -

  • आशा भोसले यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार

  • दादरच्या शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले

  • सिनेसृष्टीतील कलाकार आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले

सूर सम्राज्ञी आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. दादरच्या शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार, संगीत विश्वातील दिग्गज, राजकीय नेते यांनी उपस्थिती लावली होती.

आशा भोसले यांचे रविवारी मुंबईत निधन झाले. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान हृदविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर देशभरातील त्यांचे लाखो चाहते आणि सेलिब्रिटींना मोठा धक्का बसला.

आज सकाळी ११ वाजता आशा भोसले यांचे पार्थिव कासा ग्रँड लोअर परेल येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सिनेसृष्टीतील कलाकार, राजकीय नेते, क्रीडा विश्वातील खेडाळू आले होते. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानापासून दादरच्या शिवाजी पार्कपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. आशा भोसलेंच्या पार्थिवाला तिरंग्याने मानवंदना देण्यात आली. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, भाजप नेते आशिष शेलार, मुंबईच्या महापौर रितू तावडे, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासोबत आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्क येथे आले होते.

तसंच, सिनेसृष्टीतील कलाकार रितेश देशमुख, तब्बू, विकी कौशल, राकेश रोशन, अनुराधा पौडवाल, नितीन मुकेश, निल नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, हेलन, रणवीर सिंह, आमिर खान, सचिन पिळगावकर, सुशांत शेलार यांच्यासह अनेक कलाकारांनी आशा भोसले यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

तर, क्रीडा विश्वातून देखील अनेक दिग्गज आशा भोसलेंना अखेरचा निरोप देण्याठी आले होते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसोबत आला होता. क्रिकेटर मोहम्मद सिराजने देखील आशा भोसले यांचे अंत्यदर्शन घेत त्याना श्रद्धांजली वाहिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

SCROLL FOR NEXT