Legendary Actress Sandhya Shantaram Saam
मनोरंजन बातम्या

संध्या शांताराम यांनी अखेरचा श्वास कुठे घेतला? त्यांचा मृत्यू कशामुळे झाला? सावत्र मुलानं सांगितलं खरं कारण

Legendary Actress Sandhya Shantaram: सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांनी ४ ऑक्टोबर २०२५ रोजी अखेरचा श्वास घेतला. संध्या शांताराम यांच्या मृत्यूनंतर किरण शांताराम यांनी मोठी माहिती दिली.

Bhagyashree Kamble

  • संध्या शांताराम यांचं निधन.

  • ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.

  • किरण शांताराम यांच्याकडून मोठी माहिती.

सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे ४ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळामुळे त्यांना अनेक आरोग्याच्या समस्या होत्या. अशी माहिती संध्या शांताराम यांच्या कुटुंबियांनी दिली. मात्र, व्ही. शांताराम यांची दुसरी पत्नी जयश्री यांचा मुलगा किरण शांताराम यांनी संध्या शांताराम यांच्या मृत्यूबाबत मोठी माहिती दिली आहे. ३ ऑक्टोबर रोजी संध्या शांताराम यांनी श्वास सोडला, असं ते म्हणाले.

किरण शांताराम या व्ही. शांताराम यांची दुसरी पत्नी जयश्री यांचे पुत्र आहेत. संध्या शांताराम या चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. किरण शांताराम यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'रात्री १० वाजताच्या सुमारास राजकमल स्टुडिओमध्ये अभिनेत्री संध्या शांताराम यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या तिथेच राहत होत्या. गेल्या ४-५ वर्षांपासून त्या आजारी होत्या. शिवाय अलिकडे त्यांना खोकला या आजारामुळे त्रासले होते'.

शिवाजी पार्क स्मशानभूमीत ४ ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संध्या शांताराम यांच्या मृत्यूच्या बातमीनंतर सर्वत्र शोककळा पसरली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संध्या शांताराम यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली. 'ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. पिंजरासारख्या दिमाखदार चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. हिंदी असो किंवा मराठी, प्रत्येक भूमिका त्यांची तितकीच गाजली'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Highway : मुंबई-पुणे प्रवास फक्त दीड तासात! तिसरा महामार्गाला होणार सुरूवात, ट्रॅफिकचा प्रश्न कायमचा सुटणार

पत्नीच्या निधनाचा धक्का, पतीनेही प्राण सोडले; एकाच वेळी अंत्यसंस्कार, साऱ्या गावाच्या डोळ्यात पाणी

Zodiac Signs: दिवाळीच्या आधी तीन राशींचे येणार 'अच्छे दिन'; होणार धनलाभ

Arbaaz Khan: ५८ व्या वर्षी अरबाज खान दुसऱ्यांदा झाला बाबा, शूराने दिला गोंडस मुलीला जन्म

मुंबईकरांसाठी खूशखबर! म्हाडाप्रमाणेच BMC काढणार घरांसाठी लॉटरी; प्राईम लोकेशनवर स्वस्तात मस्त घरे मिळणार

SCROLL FOR NEXT