Dharmendra SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dharmendra : पंजाब का मुंडा कसा बनला बॉलिवूडचा 'ही-मॅन'? धर्मेंद्र यांचा संघर्षमय प्रवास

Dharmendra Biography : धर्मेंद्र यांचे जगभरात चाहते आहेत. त्यांना बॉलिवूडचे 'ही-मॅन' म्हणून ओळखले जाते. त्यांचा संघर्षमय प्रवास कसा होता, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचा जन्म पंजाबमध्ये झाला.

धर्मेंद्र यांना बॉलिवूडचा 'ही-मॅन' म्हणून ओळखले जायचे.

धर्मेंद्र यांना आपल्या कारकि‍र्दीत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वयाच्या 89 वर्षी दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra ) यांचे निधन झाले आहे. त्यांनी आज (24 नोव्हेंबर 2025) ला अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक होती. धर्मेंद्र याची अभिनयातील कारकीर्द खूप मोठी आहे. धर्मेंद्र हे पंजाबमधील एका छोट्या गावातून आले आणि आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमावले.

धर्मेंद्र यांना बॉलिवूडचा 'ही-मॅन' म्हणून ओळखल्या जायचे. पंजाबमधील एका छोट्या गावात धर्मेंद्र यांचा जन्म झाला. त्यांनी कोणत्याही गॉडफादरशिवाय चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना 2012 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आणि फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

धर्मेंद्र यांचा जन्म

धर्मेंद्र यांचे खरे नाव धर्मेंद्र केवल कृष्ण देओल आहे. परंतु चित्रपटांमध्ये प्रवेश केल्यानंतर ते धर्मेंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील सहनेवाल गावात एका जाट शीख कुटुंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण लालटन कलान येथे केले. जिथे त्यांचे वडील केवल कृष्ण हे मुख्याध्यापक होते. त्यानंतर धर्मेंद्र यांनी त्यांच्या इंटरमीडिएट शिक्षणासाठी फगवाडा येथील रामगढिया कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी 12 वी पर्यंत शिक्षण घेतले. त्यांना पुढे शिक्षण घ्यायचे होते, परंतु अभिनयाची त्यांची आवड त्यांना मागे टाकत गेली आणि ते पुढील शिक्षण घेऊ शकले नाहीत.

धर्मेंद्र वैयक्तिक आयुष्य

धर्मेंद्र यांनी 19 वर्षांचे असताना 1954 मध्ये प्रकाश कौरशी लग्न केले. त्यांनी सनी देओल, बॉबी देओल , अजिता आणि विजेता ही मुलं होती. त्यानंतर त्यांनी 1980 मध्ये हेमा मालिनीशी लग्न केले. चित्रपटांमध्ये काम करताना धर्मेंद्र आणि हेमा मालिनी हे एकमेकांच्या प्रेमात पडले.

धर्मेंद्र यांचे चित्रपट

धर्मेंद्र चित्रपटांमध्ये करिअर करण्यासाठी मुंबईत गेले. फिल्मफेअर मासिकाचा न्यू टॅलेंट अवॉर्ड जिंकल्यानंतर ते मुंबईत आले. धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर, 1961 मध्ये धर्मेंद्र यांनी 'शोले और शबनम', 'अनपढ' आणि 'बंदिनी' यासह अनेक हिट चित्रपट दिले. त्यांनी 'शोले', 'सीता और गीता', 'धरम वीर', "यादों की बारात', 'चरस' आणि 'चुपके चुपके' यासह अनेक हिट चित्रपट दिले. धर्मेंद्र यांचा 'इक्कीस'(Ikkis) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. नुकताच इक्कीसचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

धर्मेंद्र यांचे नेटवर्थ

मीडिया रिपोर्टनुसार, धर्मेंद्र यांची एकूण संपत्ती 500 ते 535 कोटी रुपये आहे. सुरुवातीच्या काळात धर्मेंद्र गॅरेजमध्ये झोपायचो. ड्रिलिंग फर्ममध्ये देखील त्यांनी काम केले आहे. त्यांनी अभिनय, निर्मिती क्षेत्र, ब्रँड जाहिराती आणि गुंतवणुकीद्वारे अफाट संपत्ती कमावली आहे. धर्मेंद्र यांचा लोणावळ्यात फार्महाऊस आहे. तसेच मुंबईतील जुहू येथे आलिशान घर आहे. धर्मेंद्र यांच्याकडे लग्जरी कारचे कलेक्शन आहे. यात रेंज रोव्हर, मर्सिडीज यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lasun Chutney: रोज वरण भात खाऊन कंटाळलात? मग गरमा गरम भाकरीसोबत करा लसणाच्या स्पेशल चटणीचा बेत

खरे 'ही मॅन', ते कायम आठवणीत राहतील; धर्मेंद्र यांच्या निधनानंर सचिन पिळगावकरांची भावनिक पोस्ट

Mumbai Traffic : मुंबईतील महत्वाच्या पुलावरील वाहतुकीत मोठा बदल, पर्यायी मार्ग काय? जाणून घ्या

कोणत्या भाज्यांमध्ये लसूण वापरू नये?

Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली बस दरीत कोसळली, ५ जणांचा मृत्यू; २३ गंभीर

SCROLL FOR NEXT