Hema Malini: 'ते ठीक आहेत...'; हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल दिली अपडेट, हात जोडून मानले आभार, व्हिडिओ व्हायरल

Hema Malini On Dharmendra Health: ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Hema Malini On  Dharmendra Health
Hema Malini On Dharmendra HealthSaam Tv
Published On

Hema Malini On Dharmendra Health: ८९ वर्षीय ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. तेव्हा त्यांच्या चाहत्यांना काळजी वाटली. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात नेण्यात आल्याचे वृत्त आहे. आता, त्यांची पत्नी हेमा मालिनी यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट दिले आहे.

७७ वर्षीय हेमा मालिनी सोमवारी मुंबई विमानतळावर दिसल्या. त्या गुलाबी आणि पांढऱ्या फुलांच्या सूटमध्ये दिसल्या. त्यांनी पापाराझींकडे हसून पाहिले. पती धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल विचारले असता, त्यांनी " ते ठीक आहेत" असे सांगत हात जोडून देवाचे आभार मानले. चाहत्यांनी अभिनेते आता बरे झाल्याबद्दल सुटकेचा नि:श्वास सोडला.

Hema Malini On  Dharmendra Health
World Cup: हिंदुस्तान जिंदाबाद...; बॉलिवूड सेलिब्रिटींकडून भारतीय महिला क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव

हेमा मालिनी यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

एका नेटकऱ्यांने तिच्या व्हिडिओवर टिप्पणी केली, "तिचा नवरा आजारी आहे आणि ती बाहेर आहे." दुसऱ्याने म्हटले, "धर्मेंद्र हे महान कलाकार आहेत" तथापि, काही चाहते धर्मेंद्र यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. अनेकजण "ड्रीम गर्ल" च्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Hema Malini On  Dharmendra Health
World Cup: हिंदुस्तान जिंदाबाद...; बॉलिवूड सेलिब्रिटींकडून भारतीय महिला क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव

धर्मेंद्र आयसीयूमध्ये होते.

मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की, "धर्मेंद्र श्वास घेण्यास त्रास होत होता म्हणून त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले होते." पत्रकार विकी लालवाणी यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने सांगितले की त्यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि काळजी करण्याची गरज नाही. त्यांचे हृदय गती आणि रक्तदाब सर्व सामान्य आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com