Dharmendra Health Update : प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते धर्मेंद्र यांच्याबद्दल बातमी समोर येत आहेत, त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब सध्या त्यांच्यासोबत रुग्णालयात आहे.
धर्मेंद्र हे वृद्धपकाळाशी संबंधित आजारांशी झुंजत आहेत. त्यांना बऱ्याच काळापासून अनेक आरोग्य समस्या जाणवत होत्या. त्यांना ३१ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना नियमित तपासणीसाठी दाखल करण्यात आल्याचे वृत्त होते. तथापि, आता त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात नेण्यात आले आहे.
धर्मेंद्र यांचा आगामी चित्रपट
धर्मेंद्र गेल्या साडेसहा दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत. ते गेल्या काही काळापासून त्यांच्या "एक्कीस" नावाच्या आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहेत.
श्रीराम राघवन दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा देखील आहे. अगस्त्य १९७१ च्या भारत-पाक युद्धात त्यांच्या शौर्यासाठी मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित झालेल्या अरुण खेत्रपालची भूमिका साकारताना दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.