Bhau Kadam: 'वडील फक्त रडत होते…', भाऊ कदम यांनी सांगितला ‘तो’ खास भावनिक प्रसंग, म्हणाले- 'आज इतकं नाव कमावलं पण...'

Bhau Kadam: मराठीतील प्रसिद्ध विनोदवीर अभिनेते भाऊ कदम यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले खास स्थान निर्माण केले आहेत. अभिनेते भाऊ कदम यांनी एका मुलाखतीत त्यांच्या वडिलांबद्दलता एक भावनिक अनुभव सांगितला आहे.
Bhau Kadam
Bhau KadamSaam Tv
Published On

Bhau Kadam: मराठीतील प्रसिद्ध विनोदवीर अभिनेते भाऊ कदम यांनी प्रेक्षकांच्या मनात आपले खास स्थान निर्माण केले आहेत. अभिनेते भाऊ कदम यांनी एका मुलाखतीत त्यांच्या वडिलांबद्दलता एक भावनिक अनुभव सांगितला आहे. एका मुलाखतीत अभिनेते भाऊ कदम यांनी त्यांच्या प्रवासातील एका विशेष क्षणाचे वर्णन केले आहे. त्यांनी सांगितले की, “एवढंच ना” या नाटकाच्या प्रयोगात प्रेक्षकांनी त्यांच्यावर केलेल्या प्रेमाचा वर्षाव पाहून त्यांच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. अश्रू आले होते.

मित्र म्हणे या पोडकास्टला दिलेल्या मुलाखतीत भाऊ कदम म्हणाले की, ते लहानपणापासून त्यांच्या वडिलांच्या कौतुकासाठी काम करत होते. पण आर्थिक अडचणींमुळे आणि अभिनय क्षेत्रातील अनिश्चिततेमुळे त्यांच्यात वाद व्हायचे. त्यांनी सांगितले, “मी नाटक करत होतो, पण त्यातून आर्थिक खर्च सुटत नव्हता. त्यामुळे तेव्हा नोकरी करावी असा विचार केला होता.”

Bhau Kadam
Girija Oak: 'तू ठीक आहेस ना..?' मराठी अभिनेत्रीने दिला इंटीमेट सीन, म्हणाली- 'त्याने त्याच्या व्हॅनिटी व्हॅन...'

भाऊ कदम म्हणाले, पण एक दिवस विजय निकमने त्यांना नाटकात काम करण्याचा आग्रह धरला. तेव्हा त्यांचे विचार बदलले आणि नोकरी करण्याऐवजी त्यांनी नाटकात काम करणे स्वीकारले. त्यानंतर मात्र 'एवढेच ना' च्या एका प्रयोगादरम्यान घडलेला प्रसंग त्यांच्या वडिलांसाठी विशेष ठरला.

Bhau Kadam
Wedding Special Outfit: लेहेंग्यापासून साडीपर्यंत...; लग्नसराईत या आऊटफिटमुळे मिळेल एक ग्लॅमरस लूक

भाऊ कदम वडिलांचा किस्सा सांगत म्हटलं, 'एवढेच ना' नाटकाच्या एका प्रयोगाला माझे वडील आले होते. माझा मित्र त्यांना विलेपार्लेच्या नाट्यगृहात घेऊन आला. त्या नाटकाला अनेक लाफ्टर्स येत होते. प्रेक्षक टाळ्या वाजवत कौतुक करत होते आणि ते पाहून वडील फक्त रडत होते. मला ते बघता आलं नाही, माझं पुढे कसं होणार, असा विचार कायम त्यांना असायचा. पण, तेव्हा माझं कौतुक होताना पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. पण, आज इतकं नाव कमावलं आहे, पण ते बघण्यासाठी वडील नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com