Famous Actress Death saam tv
मनोरंजन बातम्या

Famous Actress Death : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, मनोरंजन विश्वावर शोककळा

Legend Actress Passes Away : टिव्ही शो आणि चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या दिग्गज अभिनेत्रीचे निधन झाले आहे. त्यांच्या मुलाने सोशल मीडियावर पोस्ट करून निधनाची दुःखद बातमी शेअर केली आहे.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्रीने निधन झाले.

टिव्ही अभिनेत्रीने बॉलिवूडच्या अनेक कलाकारांसोबत काम केले आहे.

अभिनेत्रीच्या निधनाची माहिती तिच्या मुलाने दिली.

मनोरंजन सृष्टीतून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन झाले. टिव्ही आणि चित्रपट विश्व गाजवणाऱ्या अभिनेत्री नवनींद्र बहल (Navninder Behl) यांनी वयाच्या 76 वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. नवनींद्र बहल यांच्या निधनाची बातमी त्यांच्या मुलांना पोस्ट करून चाहत्यांना दिली आहे. नवनींद्र बहल यांच्या मुलाचे नाव कानू बहल (Kanu Behl) असे आहे. ते प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत.

कानू बहल यांची पोस्ट

"माझा आधारस्तंभ

माझी श्रद्धा

प्रेम

मार्गदर्शक

गुरु

माझे हृदय

सुखरूप जा, आई

जोवर तू मला पुन्हा जन्म देत नाहीस, तोवर

माझे डोळे सदैव त्या निखळ हास्याला, त्या उबदार खळखळाटाला, त्या घट्ट मिठीला आणि त्या कुतूहलाने चमकणाऱ्या डोळ्यांना शोधत राहतील. जे सदैव तेजोमय आहेत.

माझ्या आत्म्याला प्रकाशमान केल्याबद्दल, तुझे आभार..."

नवनींद्र बहल यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कलाकार मंडळी, चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मीडिया रिपोर्टनुसार, नवनींद्र बहल यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. त्यांनी लहानपणी रंगमंचीय सादरीकरणाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तसेच शाळा-कॉलेजात नाटकांमध्ये भाग घेतला.

वर्कफ्रंट

नवनींद्र बहल यांनी थिएटर, सिनेमा आणि टेलिव्हिजनमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते दिवाने आहेत. त्यांनी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत यांच्यासोबत 'क्वीन' चित्रपटात काम केले आहे. त्यासोबत त्या 'ओये लकी!', 'सिस्टर्स अँड सिस्टर्स', 'माचिस', 'द प्राइड' आणि 'द गुरू' सारख्या चित्रपटांमध्ये दिसल्या. तसेच त्यांनी अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. यात 'इश्कबाज', 'दिल बोले ओबेरॉय', 'विजी' आणि 'सदा-ए-वादी' यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : पावसाळ्यात रात्री डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपताय? सावधान! शरीरावर होतायेत 'हे' गंभीर परिणाम

Maharashtra News Live Update : धोकादायक आंबा घाटातून एसटी वाहतूकही बंद

Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल अचानक महागले; या राज्य सरकारने लावला 'विशेष सेस', नवी दरवाढ लागू

Tea Affect On Digestion System: चहा प्यायल्याने पचनक्रियेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या ‘हे’ 5 महत्त्वाचे फायदे- तोटे

Daulatabad Fort : इतिहासातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक! दौलताबादच्या अभेद्य संरक्षण रचनेचं रहस्य वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT