Big Boss Marathi 5 canva
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi 5: निक्कीसोबतच्या रिलेशनशिपवर अरबाजची गर्लफ्रेंड स्पष्टच बोलली, म्हणाली....

Leeza on Arbaz and Nikki's Relationship : बिग बॉस मराठीचा पाचवा सिझन चांगलाच घुमाकूळ घालताना दिसतोय. बिग बॉसच्या घरातील निक्की आणि अरबाजच्या जोडीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशा परिस्थितीमध्ये अरबाजची गर्लफ्रेंड तिच्या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरू आहे. या पाचव्या अभिनेते आणि रिल स्टार सदस्यांना बिग बॉसच्या घरात प्रवेश देण्यात आलाय. पहिल्या दिवसांपासून सदस्यांचे राडे आणि रडारडीने बिग बॉसचा पाचवे सत्र चर्चेत आहे. या घरात असलेल्या अरबाज आणि निक्कीची जोडी सुरुवातीपासूनच भरपूर चर्चेत आहे. वागणूक आणि खेळण्याची पद्धत यावरून या दोघांची भांडणं होत असतात. बिग बॉसच्या घरातील ५व्या आठवड्यामध्ये निक्की आणि अरबाजमध्ये खटके उडालेत. त्यावेळी घरातील सर्व सदस्य अरबाजच्या मागे अगदी खंबीरपणे उभे होते. त्याच्या पुढच्या आठवड्यातच लगेच अरबाज आणि निक्की पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं.

अरबाजच्या अशा वागणुकीमुळे विकेंडच्या भाऊच्या धक्क्यातही त्याची चांगलीचं शाळा घेण्यात आली. दोघांच्या वागणुकीमुळे निक्कीला देखील मोठी शिक्षा देण्यात आली आहे. असं असल्यास निक्की आणि अरबाजच्या नात्याची सोशल मीडियावर वारंवार चर्चा होत असते. तसेच अरबाजने बिग बॉसच्या घरात 'मी कमिटेड आहे.' असे देखील सांगितले होते. पण असं असून देखील त्याचं आणि निक्कीचं वागणं अनेकांना न पटणारं आहे. अशा परिस्थितीमध्ये अरबाजच्या गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे आणि त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा देखील रंगल्यात.

लीझा बिंद्रा ही अरबाजची गर्लफ्रेंड असून तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लीझाने म्हटलं की, 'मला कोणाबद्दल कोणत्याही प्रकारची वाईट गोष्ट ऐकायला आवडत नाही. ती गोष्ट निक्की आणि अरबाजची असेल तरी सुद्धा. त्यामुळे माझ्याकडे येऊन कुणी काही वाईट बोलून गेलं तर मी ते ऐकून घेणार नाही. त्याचंप्रमाणे आपल्याला कोणाच्या आयुष्याबद्दल बोलण्याचा आधिकार नाही. काय चूक आणि काय बरोबर हे मला काही माहिती नाही. परंतु मला कोणाबद्दल काही वाईट बोलण्याचा आधिकार नाही.'

सध्या बिग बॉसच्या घरात सदस्यांची मस्ती आणि राडे पाहायला मिळत आहेत. दररोज काही न काही ड्रामा आणि टास्क पाहायला मिळतोय. काल झालेल्या भाऊच्या धक्क्यावर निक्कीला मोठी शिक्षा मिळाली. पुढच्या आठवड्यांमध्ये निक्की कधीच कॅप्टन होऊ शकत नाही, अशी थेट घोषणा रितेश देशमुख यांच्याकडून करण्यात आली होती. बिग बॉसच्या घरामध्ये अजून काय ड्रामा पाहायला मिळतील हे पाहाणं रंजक ठरेल.

Edited By: Nirmiti Rasal.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dangerous Diet Foods : डायटिंग करताय ? हे ३ पदार्थ तुमच्या जीवावर बेतू शकतात.

Maharashtra Live News Update : बोलताना भान ठेवा, अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचले

बसने स्कूटीस्वार तरुणीला चिरडले; घटनास्थळीच मृत्यू; सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

Maharashtra Politics : निवडणूका जिंका, महामंडळ मिळवा! चंद्रशेखर बावनखुळे नेमके काय म्हणाले ? | VIDEO

ITR Filling 2025: आयकर विभागाचा मोठा निर्णय! आयटीआर रद्द झाला तरीही पुन्हा मिळणार संधी, खात्यात जमा होणार रिफंड

SCROLL FOR NEXT