Cholesterol: नसांमध्ये जमलेलं वाईट कोलेस्ट्रॉल दूर करेल केवळ हा एक ज्यूस, बनवण्याची पद्धतही एकदम सोपी!

Cholesterol: आजकाल चुकीच्या जीवनशैली अनेक आजार आपल्या मागे लागतात. अयोग्य आहारामुळे शरीरातील नसांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोकाही बळावतो. नसांमधील कोलेस्ट्रॉल कमी करायचं असेल तर एक ज्यूस तुमचं काम सोपं करणार आहे.
Cholesterol juice
Cholesterol juicesaam tv
Published On

आजकाल धावपळीच्या जीवनात चुकीच्या आहाराचं सेवन मोठ्या प्रमाणात केलं जातं. या अनहेल्दी लाईफस्टाईलमुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. शरीरात वाईट आणि चांगलं अशा दोन प्रकारचं कोलेस्ट्रॉल असून वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याचा धोका वाढतो.

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढू नये यासाठी चांगला आहार घेणं गरजेचं आहे. मात्र तुम्हाला माहितीये का, असा एक ज्यूस आहे तो तुमच्या नसांमध्ये जमलेलं वाईट कोलेस्ट्रॉल साफ करण्यात मगत करतं. शिवाय या ज्यूसच्या सेवनाने हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण देखील कमी होतं.

कोणता आहे हा ज्यूस?

हा ज्यूस आवळा आणि गाजरचा आहे. मुळात आवळा आणि गाजर या दोन्ही गोष्टी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. आवळ्यामध्ये व्हिटॅमीन सीचं प्रमाण भरपूर असतं. जे कोलेस्ट्रॉलला कंट्रोल करण्यासाठी देखील फायदेशीर असतं. दुसरीकडे गाजरामध्ये बीटा कॅरोटीन असतं जे तुमच्या हृदयापर्यंत पोहोचणाऱ्या नसांना साफ ठेवतं.

Cholesterol juice
Infertility: ५ पैकी ३ महिलांना IVF ची गरज; प्रजनन दरातही घसरण

कसा बनवायचा हा ज्यूस?

हा ज्यूस तयार करण्यासाठी २ आवळे, २ गाजर, थोडसं पाणी आणि स्वादासाठी एक चमचा मध या साहित्याची गरज भासणार आहे.

कृती- पहिल्यांदा आवळा आणि गाजर स्वच्छ धुवून घ्या. यानंतर आवळ्याचं ही काढून त्याचे छोट छोटे तुकडे करा. यासोबत गाजराचेही बारीक तुकडे करून घ्या. आता या दोन्ही गोष्टी मिक्सरमध्ये टाकून त्यात थोडं पाणी घाला. यानंतर ते चांगल्या पद्धतीने ब्लेंड करून त्याच मध टाका.

कधी प्यावा हा ज्यूस?

रोज सकाळी रिकाम्या पोटी हा ज्यूस प्यायल्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळू शकते. त्याचप्रमाणे हृदयाच्या आजारांचा धोकाही कमी होतो. आवळा आणि गाजराचा ज्यूस नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल कमी करतं. त्याचप्रमाणे हा ज्यूस शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतो. हृदयाच्या आरोग्यासोबत तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

Cholesterol juice
Health News: सकाळी उठल्यावर घसा सुकून खूप तहान लागतेय? टेस्ट करून घ्या, 'या' गंभीर आजाराचं आहे लक्षणं

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com