Health News: सकाळी उठल्यावर घसा सुकून खूप तहान लागतेय? टेस्ट करून घ्या, 'या' गंभीर आजाराचं आहे लक्षणं

Health News: मधुमेहाला सायलेंट किलर मानलं जातं. या आजारांच्या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणं फायदेशीर आहे. सकाळच्या वेळी याची कोणती लक्षणं दिसतात ते जाणून घ्या.
Dry Mouth
Dry Mouthsaam tv
Published On

चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळे अनेक आजार आपल्या मागे लागतात. यामधील एक आजार म्हणजे मधुमेह. मधुमेहाला सायलेंट किलर मानलं जातं. ज्यावेळी तुमच्या शरीरात ब्लड शुगरची मात्रा वाढते आणि इन्सुलिनची पातळी कमी होते, त्यावेळी मधुमेहासारखी गंभीर समस्या होते.

मधुमेह हा अतिशय धोकादायक मानलं जातं याचं कारण म्हणजे या आजाराचा शरीराच्या इतर अवयवांवरही परिणाम होतो. यापूर्वी केवळ प्रौढ व्यक्तींना हा त्रास व्हायचा मात्र आता लहान मुलांमध्येही टाईप १ मधुमेहाचं प्रमाण वाढताना दिसतंय.याशिवाय वयाच्या ४० नंतर देखील लोकांना टाईप २ मधुमेहाचं निदान होऊ लागलंय. वेळीच याच्या लक्षणांकडे पाहणं गरजेचं आहे. मधुमेहाची लक्षणं काय आहेत ती जाणून घेऊया.

तोंड सुकणं आणि तहान लागणं

जर तुमचं तोंड सकाळी कोरडं असेल आणि तुम्हाला खूप तहान लागली असेल, तर हे ब्लड शुगर वाढली असल्याचं कारण असू शकतं. रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त असल्याने सकाळी घसा कोरडा पडण्याची ससम्या जाणवू शकते.

Dry Mouth
C-section recovery: सिझेरीयननंतर दुर्लक्ष केल्यास होतील गंभीर परिणाम; नेमकी कशी घ्यावी काळजी?

नजर कमजोर होणं

जर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर नजर कमजोर झाल्यासारखं वाटलं तर हे देखील एक लक्षण असू शकतं. तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, मधुमेहाचा परिणाम तुमच्या डोळ्यांवर होता. अशावेळी नजर कमजोर होण्याची समस्या जाणवू शकते.

सतत थकवा जाणवणं

जर तुम्हाला संपूर्ण रात्र झोप घेऊन देखील अशक्तपणा किंवा सतत झोप येत असेल तर तुम्ही एकदा ब्लड टेस्ट करून घ्या. शरीरात साखरेचा स्तर वाढल्याने थकवा आणि तणाव वाढू लागतो. याचा परिणाम तुमच्या झोपेवर होण्याची शक्यता असते.

हात थरथरणं

ज्यावेळी शुगर लेवल 4 mmol पेक्षा कमी होते, त्यावेळी सतत भूक लागणं किंवा हात थरथरणं अशा प्रकारच्या समस्या जाणवू शकतात.याशिवाय तुम्हाला अधिक प्रमाणात घाम येण्याचाही त्रास होऊ शकतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

Dry Mouth
Blood sugar level 300 symptoms : 300 पार ब्लड शुगर झाल्यावर शरीरात दिसतात 'हे' बदल, वेळीच घ्या डॉक्टरांची मदत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com