Marathi Actor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Marathi Actor : "मी ब्रेक घेतोय..."; मराठमोळ्या अभिनेत्याचा मोठा निर्णय, कारण वाचून धक्का बसेल

Marathi Actor Take Career Break : प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता आपल्या करिअरमधून ब्रेक घेत आहे. ज्याची माहिती अभिनेत्याने स्वतः व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना दिली आहे.

Shreya Maskar

प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा निर्णय

मराठमोळ्या अभिनेत्याने घेतला करिअरमधून ब्रेक

व्हिडीओ शेअर करून अभिनेत्याने दिली मोठी अपडेट

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्याने करिअरमधून ब्रेक घेतल्याचा खुलासा केला आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ज्येष्ठ अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा लेक अभिनय बेर्डे आहे. अभिनय बेर्डेने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात मोलाचे स्थान निर्माण केले आहे. त्याच्या अभिनयाची तरुणाईमध्ये क्रेझ पाहायला मिळते. त्याने आजवर अनेक नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकताच अभिनय बेर्डेने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून आपण ब्रेक घेत असल्याचा खुलासा केला आहे.

व्हिडीओत नेमकं काय?

व्हिडीओत अभिनय बेर्डे म्हणतो की, "हाय मी अभिनय, आज व्हिडीओ बनवण्याचे कारण खूप वेगळे आणि महत्त्वाचे आहे. मी माझ्या करिअरपासून थोडा ब्रेक घ्यायचे ठरवले आहे, आणि तो ब्रेक यासाठी आहे की, मी स्वत:चा स्टार्टअप सुरू करणार आहे. त्यासाठी काही नवीन आयडिया हव्या आहेत. अजून आयडियाच्या टप्प्यात आहे मी. अजून आयडिया सुचलेली नाही आहे. त्यामुळे मला तुमची मदत लागेल. त्यामुळे तुमच्याकडे Out Of The Box काही क्रेझी आयडिया असतील तर, कमेंट्समध्ये मला नक्की कळवा."

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "मी करिअरमधून ब्रेक घेतोय...पुढच्या प्रवासासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. कारण जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की कमेंट करा..." अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहते आणि कलाकार मंडळी कमेंट्स आणि शुभेच्छांचा वर्षाव करत आहे. अभिनयला त्याच्या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देत आहेत. आता चाहते अभिनय बेर्डेचा दमदार कमबॅक पाहण्यासाठी आणि त्याच्या नवीन स्टार्टअपसाठी खूपच उत्सुक आहेत.

अभिनयचे चित्रपट

२०१७ साली रिलीज झालेल्या 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. त्यानंतर अभिनय अनेक चित्रपटांमध्ये दिसला. यात 'मन कस्तुरी रे', 'अशी ही आशिकी', 'Boyz 4', 'दशावतार', 'उत्तर','वडापाव', 'रंपाट' यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लाखोंच्या अनुदान अपहारप्रकरणी महिला तलाठी जेरबंद

South Indian banana chips: चहासोबत काहीतरी मस्त हवंय? घरच्या घरी बनवा साऊथ स्टाईल कुरकुरीत बनाना चिप्स

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेची नवीन नोंदणी अन् e-KYC सुरू? 'या' व्हायरल मेसेजमागचं धक्कादायक सत्य आलं समोर

Political News : दिल्लीत हालचालींना वेग! मोदींच्या कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होणार, 'या' नेत्यांना मिळणार मोठी जबाबदारी

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऑक्टोबरमध्ये येऊ शकतात २००० रुपये; ही एक चूक केली तर पैसे अडकणार

SCROLL FOR NEXT