Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Gunaratna Sadavarte : सदावर्तेंसोबत पत्नी जयश्रीही दिसणार होत्या बिग बॉसच्या घरात, पण ऐनवेळी दिला नकार, कारण काय?

Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्ते यांची पत्नी देखील बिग बॉसच्या घरात येणार होती. असा खुलासा त्यांनी स्वतःच केला आहे.

Shreya Maskar

आपल्या वक्तव्याने 'बिग बॉस 18' चं (Bigg Boss 18 ) घर गाजवणाऱ्या वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांची बिग बॉसच्या घरातून एक्झिट झाली आहे. न्यायालयात गुणरत्न सदावर्ते यांची केस बाकी असल्यामुळे त्यांना अचानक मध्येच बिग बॉसच घर सोडाव लागले.

घराबाहेर पडल्यावर सदावर्तेंनी आपली पत्नी जयश्री पाटीलसोबत अनेक मुलाखती देत आहेत. त्या मुलाखतीत गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत जयश्री पाटील यांनी देखील खूप मोठे खुलासे केले आहेत.

एका मिडिया मुलाखतीत गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीला प्रश्न विचारण्यात आला की, गुणरत्न सदावर्ते यांना बिग बॉसमध्ये पाहून तुम्हाला कसं वाटलं? यावर जयश्री यांनी उत्तर दिलं की, "मला खूप भारी वाटलं. जसे बाहेर आहेत तसेच ते घरातही वागले. ते खूप खरे आहेत. बिग बॉसमधलं त्यांचे वागणे खूपचं भारी होतं. मला त्यांच्यात काही फरक वाटत नाही."

वकील जयश्री पाटील पुढे म्हणाल्या की, "माझी खूप इच्छा होती की यांना कामातून थोडा ब्रेक मिळावा. माझं लग्न झाल्यापासून मला जास्त वेळ आईच्या घरी जाऊ दिलं नाही. जेव्हा कधी गेली तेव्हा देखील लगेच परत यायची. कारण आम्ही खूप काम करतो. खरतंर मलाही बिग बॉसची ऑफर आली होती. पण आमची मुलं लहान आहेत. त्यामुळे मी जाऊ शकले नाही. म्हणूनच मी यांना तुम्ही जा सांगितले.

"या आठवड्यात 'बिग बॉस 18' च्या घरात 10 सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यातून या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

Maharashtra Live News Update : उदयनराजे-जयकुमार गोरे यांच्यात मिश्कील दिलजमाई

Veg Biryani Recipe : स्ट्रीट स्टाइल चटपटीत व्हेज बिर्याणी, एकदा खाल तर खातच रहाल

Accident : ऐन सणासुदीत ८ जणांचा अपघाती मृत्यू, पिकअप 100 फुटावरून कोसळला; चांदसैली अपघाताचा ग्राउंड रिपोर्ट समोर

SCROLL FOR NEXT