मनोरंजन बातम्या

Lakshmichya Pavalani: लग्नाची उष्टी हळद नयनाऐवजी कलाला; ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत नवा ट्विस्ट

Lakshmichya Pavalani: नियतीच्या मनातही अद्वैत आणि कलाने एकत्र यावं ही एकच इच्छा आहे. साखरपुडा, हळद आणि संगीत तर पार पडलंय. त्यामुळे आता उत्सुकता आहे ती लग्नाची.

साम टिव्ही ब्युरो

Lakshmichya Pavalani:

स्टार प्रवाहवरील लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेत नयना आणि अद्वैतच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. लग्न जरी नयना आणि अद्वैतचं होणार असलं तरी योगायोगाने कला आणि अद्वैतला आयुष्यभरासाठी एकत्र आणणाऱ्या घटना घडताना दिसत आहेत.

साखरपुड्याची अंगठी अद्वैतकडून नयनाऐवजी कलाच्या बोटात घातली गेली. लग्नाची उष्टी हळदही नयनाऐवजी कलाला लागली. नियतीच्या मनातही अद्वैत आणि कलाने एकत्र यावं ही एकच इच्छा आहे. साखरपुडा, हळद आणि संगीत तर पार पडलंय. त्यामुळे आता उत्सुकता आहे ती लग्नाची.

नयना आणि अद्वैतच्या लग्नासाठी मंडप सजलाय. वऱ्हाडीही जमलेत. त्यामुळे अद्वैतच्या घरात लक्ष्मीच्या पाऊलांनी कोण जाणार हे लवकरच स्पष्ट होईल.

मालिकेत नयना हे पात्र अभिनेत्री इशा केळकर साकारत आहे. इशाने याआधी जय मल्हार या मालिकेत काम केलंय. तिची ही मालिका प्रचंड गाजली. यामध्ये तिने बानूबयाचं पात्र साकारलं होतं. तर अद्वैत हे पात्र अभिनेता अक्षर साकारत आहे. अक्षर देखील छोट्या पडद्यावरील नावाजलेला अभिनेता आहे. आता हे दोन्हीही कलाकार लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिका गाजवतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Weight Gain: थंडीच्या दिवसात वजन वाढतंय?झटपट...खाण्यापिण्यात करा ४ बदल, कमी होईल पटापट

Maharashtra Live News Update: नागपूर मधील उपमुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या विजयगडावरील अजित पवार नावाची पाटी बदलली

Working women's Jewellery: वर्किंग वुमनसाठी शानदार प्लॅटिनम दागिने, फॉर्मल लूकही करतील खास

घरातून राजकारणाचं बाळकडू, वडील स्वातंत्र्य सैनिक तर भाऊ माजी मंत्री; कसा आहे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास?

युद्धाचा भडका! एकाच वेळी १२ ठिकाणी हल्ले, पाकिस्तानचे १० सैन्य ठार; ३७ बंडखोरांचाही खात्मा

SCROLL FOR NEXT