Maratha Reservation Survey : मराठा सर्वेक्षणात अनंत अडचणी, निश्चित वेळेत काम पूर्ण करु; महाडच्या तहसिलदारांना विश्वास

अनेक ठिकाणी नाेंदणी होण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत.
188 praganak and 15 paryavekshak deputed in mahad near raigad for maratha reservation survey
188 praganak and 15 paryavekshak deputed in mahad near raigad for maratha reservation surveysaam tv
Published On

- सचिन कदम

Mahad News :

राज्य शासनाने मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सर्वेक्षण (Maratha Reservation Survey) करण्याचा आदेश दिल्यानंतर महाड तालुक्यात सर्वेक्षण सुरू झाले. परंतु या सर्वेक्षणामध्ये तांत्रिक आडचणी येत असल्याने काम ठप्प आहे. दरम्यान येत्या 30 जानेवारीपर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण हाेईल असे महाडचे तहसिलदार महेश शिताेळे यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. (Maharashtra News)

मराठा समाजाच्या सर्वेक्षणाच हे काम ऑनलाईन पद्धतीने केले जात आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात 188 प्रगणक व15 पर्यवेक्षक यांची या कामाकरीता नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती तहसिलदार महेश शितोळे यांनी दिली आहे.

दरम्यान महाड तालुक्यातील दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टीव्हिटीची समस्या मोठी आहे. त्याच बराबर संपूर्ण राज्यभरात नोंदणी सुरु असल्याने सर्व्हर उघडत नाही. यामुळे सर्वेक्षणाच्या कामात व्यत्यय येत आहे. अनेक ठिकाणी नाेंदणी होण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत.

188 praganak and 15 paryavekshak deputed in mahad near raigad for maratha reservation survey
APMC Market Vashi : आंबा खवय्यांसाठी खुशखबर, एपीएमसीत आंब्याच्या पेट्या दाखल; जाणून घ्या दर

याबाबत तहसिलदार महेश शितोळे म्हणाले तहसिल कार्यालयात मदत कक्ष स्थापन करून सर्वेक्षणात येणाऱ्या आडचणी दुर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. येत्या 30 जानेवारीपर्यंत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचा महाड तहसिल कार्यालय प्रयत्न करेल असा विश्वास शिताेळेंनी व्यक्त केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

188 praganak and 15 paryavekshak deputed in mahad near raigad for maratha reservation survey
Mandhardevi Yatra 2024 : भाविकांनाे! मांढरदेव गडावर काळूबाईच्या यात्रेला निघालात? जाणून घ्या वाहतुकीतील बदल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com