Lai Avadtes Tu Mala SAAM TV
मनोरंजन बातम्या

Lai Avadtes Tu Mala : 'लय आवडतेस तू मला' मालिकेत नवं वादळ, सरकार-सानिकाच्या विरोधात संपूर्ण कळशी गाव

Lai Avadtes Tu Mala Update : 'लय आवडतेस तू मला' मालिकेत आता नवीन वळण पाहायला मिळत आहे. सरकार-सानिकाच्या विरोधात संपूर्ण कळशी गाव उभे राहिले आहे.

Shreya Maskar

'लय आवडतेस तू मला' (Lai Avadtes Tu Mala ) मालिका प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मालिकेत साहेबरावांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यापासून सगळीच गणिते बदलली आहेत. सरकार - सानिका आणि संपूर्ण धुमाळ कुटुंब आप्पांची प्रकृती कशी लवकरात लवकर बरी होईल यासाठी प्रयत्नात आहेत. पण हे सगळं घडत असताना सरकार मात्र सानिकाची पुरेपूर काळजी घेतो आहे की, तिला त्या गावात, घरात एकटे वाटणार नाही. तो सानिकाला खुश ठेवण्याचे बरेच प्रयत्न देखील करत आहे.

साहेबरावांनी फॅक्टरी बंद केल्यानंतर कळशी गावातील गावकरी बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे आता गावकऱ्यांना दोघेही गावात नकोसे झाले आहेत. संपूर्ण कळशी गाव सरकार सानिकाच्या विरोधात उभे आहे. सरकारच्या घरच्यांना धक्का बसतो जेव्हा सई कमलला सांगते, पूर्ण गावानं कुटुंबाला वाळीत टाकलय. लाइट, पाणी, किराणा सगळ बंद केलंय.

कमल सानिकाला दोषी ठरवते पण, या सगळ्यात सानिकाला सरकारला साथ देते. आता या सगळ्यातून सरकार - सानिका कसा मार्ग काढणार? हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. 'लय आवडतेस तू मला' मालिका रात्री ९.३० वाजता कलर्स मराठीवर पाहायला मिळते.

सरकारच्या घरात अजून सानिकाला सगळ्यांनी स्वीकारलं नाहीये. सईच्या बोलण्यात येऊन कमल अजूनही सानिकाला विरोधात आहे. लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी बाबू आणि विभा सरकार सानिकाला गपचूप प्लान करून एका ठिकाणी घेऊन जाण्याचे ठरवतात. आता सईला हे कळताच व्हॅलेंटाईन स्पॉइल करण्यासाठी सई काय डाव रचणार हे कळेल. तर दुसरीकडे गावाने वाळीत टाकले आहे, हे सरकार सानिकाला कळल्यावर त्यांना खूप अस्वस्थ वाटते. सरकार - सानिका दोघे घडलेल्या प्रकाराबद्दल चर्चा करतात आणि मार्ग काढायचे ठरवतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

Post Office Scheme: ५ वर्षात मिळणार ३६ लाख रुपये, या सरकारी योजनेत गुंतवणूक करुन व्हाल मालामाल

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

SCROLL FOR NEXT