Sharad Ponkshe : "आता आमची इच्छाच मेली..." नाटकाच्या प्रयोगादरम्यान शरद पोंक्षे असं का म्हणाले?

Sharad Ponkshe Beed Video: मराठी अभिनेते शरद पोंक्षे यांनी बीडमधील नाट्यगृहाच्या दुरावस्थेबाबत खंत व्यक्त केली आहे. नेमकं ते काय म्हणाले, जाणून घेऊयात.
Sharad Ponkshe Beed Video
Sharad PonksheSAAM TV
Published On

योगेश काशीद - साम प्रतिनिधी

सध्या 'पुरुष' नाटक सर्वत्र गाजत आहे. 'पुरुष' नाटकाचे लेखक जयवंत दळवी आहेत. या नाटकात अनेक तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. नाटकात शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) , स्पृहा जोशी, अविनाश नारकर, अनुपमा ताकमोगे, निषाद भोईर, नेहा परांजपे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नुकताच 'पुरुष' नाटकाचा प्रयोग बीडमध्ये पार पडला. तेव्हा अभिनेते शरद पोंक्षे यांनी नाट्यगृहाच्या अस्वच्छतेसंदर्भात आपले मत मांडले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

'पुरुष' (Purush ) नाटकाचा प्रयोग सादर करण्यासाठी शरद पोंक्षे आपल्या सह कलाकारांसोबत बीडमध्ये आले होते. यादरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची दुरावस्था पाहून उपस्थित कलाकारांनी हात जोडले.

नाट्यगृहाची दुरावस्था पाहून शरद पोंक्षे म्हणाले की, "नाटक करायला आलेल्या कलाकारांची फजिती होत असेल. तर भविष्यात बीडकर चांगले नाटक पाहण्यास मुकतील. बीडमध्ये दोन वर्षानंतर नाटक आले परंतु अशी अवस्था असेल तर कसे येतील नाटक? टॉयलेट नाही कॅन्टीन नाही. एवढे मोठे नाट्यगृह उभारले असताना साधी तिकीट विंडो देखील बंद अवस्थेत आहे. ही परिस्थिती पाहून नाटक करायची इच्छा मेली आहे."

शरद पोंक्षे पुढे म्हणाले, "रसिक-प्रेक्षकांसमोर नाटक सादर करण्यासाठी आम्ही इतका प्रवास करून येथे आलो आहोत. मात्र पुन्हा येथे येणे आम्हाला शक्य नाही. कारण नाट्यगृहाची भयानक दुरावस्था आहे. आमच्याकडून एसी थिएटरचं भाडे म्हणून २१ हजार रुपये घेतले. मात्र येथे एसी नाही. बाथरूमची अवस्था तर भीषण आहे. यात महिला कलाकार जाऊ शकत नाही. स्वच्छता नाही. तसेच मेकअप रूम देखील नाही. अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी. "

शेवटी शरद पोंक्षे म्हणाले, "माझ्या या बोलण्याचा काही परिणाम होणार नाही याची मला खात्री आहे. कारण मी या विषयावर १००० वेळा बोलून झालो आहे. ही खूपच वाईट अवस्था आहे. "

बीड शहरात 'यशवंतराव चव्हाण नाट्यगृह' हे कलाकारांसह रसिक प्रेक्षकांसाठी हे एकमेव व्यासपीठ आहे. मात्र याच नाट्यगृहाची मोठी दुरावस्था असून पालिका प्रशासनाकडून या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले जाते. या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी बीड मधील कलाकारांनी आंदोलन केली. मात्र त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

Sharad Ponkshe Beed Video
Chhaava Worldwide Collection : 'छावा'ची जगभरात गर्जना! लवकरच गाठणार 200 कोटींचा टप्पा, वर्ल्डवाइड कलेक्शन किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com