Death News  saam tv
मनोरंजन बातम्या

Death News : प्रसिद्ध कलाकाराचे निधन; पार्कमध्ये कोसळला अन्..., मनोरंजन विश्वावर शोककळा

Social Media Star Death : प्रसिद्ध सोशल मिडिया स्टारचे निधन झाले आहे. ज्यामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली.

Shreya Maskar

सोशल मिडिया स्टारचे निधन

कलाकार पार्कमध्ये चालताना खाली कोसळला

मनोरंजन विश्वावर शोककळा

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. 'कुर्ची मडथापेटी' (Kurchi Madathapetti) या गाण्यामागील व्यक्तीचे निधन झाले आहे. ज्यामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली. मोहम्मद पाशा (kurchi tata - खुर्ची आजोबा) म्हणून प्रसिद्ध झालेल्या कलाकाराचे निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने कलाकाराने हैदराबादमध्ये अखेरचा श्वास घेतला.

deccan chronicle च्या वृत्तानुसार, हैदराबादचे रहिवासी असलेले मोहम्मद पाशा, जे सोशल मीडियावर 'Kurchi Thatha' (खुर्ची आजोबा) म्हणून प्रसिद्ध झाले. हैदराबादमधील कृष्णकांत पार्कजवळून चालत जात असताना ते अचानक कोसळले. कलाकाराच्या अशा अचानक जाण्याने मनोरंजन विश्वावर मोठा धक्का बसला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाशा यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांना हा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा संशय आहे.

मोहम्मद पाशा यांना सोशल मीडियामुळे खूप लोकप्रियता मिळाली. त्यांनी एका यूट्यूब मुलाखतीत उच्चारलेला 'Kurchi Madathapetti' हा संवाद प्रचंड व्हायरल झाला होता. हा संवाद खूप कमी वेळात तेलुगू सोशल मीडियावरील 'मीम कल्चर'चा (meme culture) एक अविभाज्य भाग बनला. या व्हायरल संवादावरूनच पुढे महेश बाबू यांच्या 'गुंटूर कारम' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील 'Kurchi Madathapetti' हे भन्नाट गाणे तयार करण्यात आले, जे सुपरहिच झाले. यामुळे मोहम्मद पाशा हे चित्रपटप्रेमी आणि 'मीम' तयार करणाऱ्यांमध्ये एक अत्यंत ओळखीचा चेहरा बनले.

'कुर्ची मडथापेटी' (Kurchi Madathapetti) हे २०२४ मधील 'गुंटूर कारम' (Guntur Kaaram) या तेलगू चित्रपटातील एक अतिशय लोकप्रिय गाणे आहे. महेश बाबू आणि श्रीलीला यांनी या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. गाण्याला संगीत थमन एस. यांनी दिले आहे.

हैदराबादच्या रस्त्यांवरील एका सामान्य वृद्ध व्यक्तीपासून ते 'पॉप-कल्चर आयकॉन' बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास उल्लेखनीय आहे. ज्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच चाहते आणि इंटरनेट वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: NEET पेपर फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांची CBI करणार चौकशी

Gold Rate Today: सलग चौथ्या दिवशी सोन्याचे दर वाढले; तब्बल इतक्या रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Accident News : भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली एसटी बस उलटली, अनेकजण जखमी

प्राचीन ज्योतिर्लिंगांपासून ते शांत नदीकाठच्या मंदिरांपर्यंत; नाशिकमधील 'या' १० प्रसिद्ध ठिकाणांना नक्की भेट द्या

Fridge Cooling : फ्रिज चालू आहे पण कुलिंग होत नाही? 'या' ५ चुका तर तुम्ही करत नाही ना...

SCROLL FOR NEXT