Divyenndu- Mirzapur The Movie : मुन्ना भैया मोठ्या पडद्यावर येणार; 'मिर्झापूर: द मुव्ही' रचणार मोठा इतिहास, 'या' ट्विस्टने खेळ बदलणार

Divyenndu Talk On Mirzapur The Movie : मुन्ना भैय्या आता मोठ्या पडद्यावर येणार आहे. 'मिर्झापूर' चित्रपटाबद्दल अभिनेता दिव्येंदूने मोठे खुलासे केले आहे. तो नेमकं काय म्हणाला, जाणून घेऊयात.
Divyenndu Talk On Mirzapur The Movie
Divyenndu- Mirzapur The Moviesaam tv
Published On
Summary

'मिर्झापूर' आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

'मिर्झापूर: द मुव्ही' मधून मुन्ना भैय्या पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार.

अभिनेता दिव्येंदूने 'मिर्झापूर' चित्रपटातील मोठ्या ट्विस्ट बद्दल सांगितले.

जगभरात लोकप्रिय असलेली 'मिर्झापूर' वेब सीरिज आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. चाहते 'मिर्झापूर' चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातल्यानंतर 'मिर्झापूर' आता थिएटर गाजवायला सज्ज आहे. 'मिर्झापूर: द मुव्ही' चित्रपटात भव्य ॲक्शन सीक्वेन्स, नवीन ट्विस्ट, तीव्र संघर्ष आणि एका भव्य सिनेमॅटिक अनुभव पाहायला मिळेल. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी 'मुन्ना भैय्या' म्हणजे प्रेक्षकांचा लाडका दिव्येंदूने आपला उत्साह व्यक्त केला आहे.

इंडिया टीवीच्या वृत्तानुसार, दिव्येंदू म्हणाला, "हे पूर्णपणे विंटेज मिर्झापूर असणार आहे. आम्ही पूर्ण ताकदीने परत येत आहोत. तुम्हाला पहिल्या सीझनमधील तीच पात्रे दिसतील, ती जशी होती तशीच असतील. पार्श्वभूमी अगदी तशीच आहे, पण परिस्थिती वेगळी आहे. हा एक चित्रपट असल्यामुळे, तो एका खूप मोठ्या, सिनेमॅटिक कॅनव्हासवर बनवला आहे आणि तो खऱ्या अर्थाने चाहत्यांसाठी आहे."

'मुन्ना भैय्या'साठी मिळालेल्या प्रेमाबद्दल आणि भूमिका साकारण्याबद्दल बोलताना, दिव्येंदू म्हणाला, "आजही लोकांचे मुन्नावर असलेले प्रेम मला पूर्णपणे समजू शकत नाही. कधीकधी मला आश्चर्य वाटते की असे पात्र खरोखरच कोणत्यातरी समांतर विश्वात अस्तित्वात आहे का...तिसऱ्या सीझनमध्ये माझ्या पात्राचा मृत्यू झाल्यापासून, लोक जुन्या हिंदी गाण्यांचे भावनिक रील्स बनवून त्याला परत येण्याची विनंती करत होते..."

दिव्येंदू पुढे म्हणाला, "मी खरोखर अशी आशा करतो की, मी या पात्राला पुन्हा एकदा पूर्ण न्याय देईन. मी हे पात्र नव्याने साकारू की पहिल्या सीझनमध्ये जे केले होते त्याचीच पुनरावृत्ती करू, याबद्दल मी सुरुवातीला थोडा गोंधळात होतो. कमाई आणि रेवेन्यू स्ट्रीमिंगच्या बाबतीत ही एक मोठी क्रांती ठरणार आहे. मला वाटते की, हा फॉर्म्युला यशस्वी होतो की नाही हे पाहण्यासाठी अनेक लोक उत्सुक आहेत, जेणेकरून तेही असेच काहीतरी करू शकतील. जसे 'मिर्झापूर' पहिल्यांदा प्रदर्शित झाला तेव्हा कोणालाही त्याच्याकडून फारशा अपेक्षा नव्हत्या, त्याचप्रमाणे हा चित्रपटही काहीतरी असेच साध्य करण्याच्या मार्गावर आणि इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे, असे मला वाटते."

'मिर्झापूर: द मुव्ही' रिलीज डेट

एका लोकप्रिय वेब सीरिजला चित्रपटात रूपांतरित करण्याचा हा नवीन प्रयोग यशस्वी होतो की नाही, हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली निर्मित, या चित्रपटाचे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले आहे. तसेच कथा पुनीत कृष्णा यांनी लिहिली आहे. 'मिर्झापूर: द मुव्ही' चित्रपट ४ सप्टेंबर २०२६ रोजी जगभरातील प्रदर्शित होणार आहे.

Divyenndu Talk On Mirzapur The Movie
Pravin Tarde-Deool Band 2 : आता परीक्षा देवाची! प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद २' प्रदर्शित, पहिल्या दिवशीच हाऊसफुलची पाटी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com