Shah Rukh Khan On Karan Johar Friendship Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan On Karan Johar Friendship: ‘मी आणि करण जोहर मित्र नाही, पण... ’, ‘कुछ कुछ होता है’ च्या स्पेशल स्क्रिनिंगदरम्यान असं का म्हणाला किंग खान?

Shah Rukh Khan And Karan Johar News: अंजली, राहुल आणि टीना या त्रिकुटांची लव्हस्टोरी असलेल्या ‘कुछ कुछ होता है’ला आज प्रदर्शित होऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी निर्मात्यांकडून चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं.

Chetan Bodke

Kuch Kuch Hota Hai 25 Years Complete

अंजली, राहुल आणि टीना या त्रिकुटांची लव्हस्टोरी असलेल्या ‘कुछ कुछ होता है’ला आज प्रदर्शित होऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने केले आहे.

१६ ऑक्टोबर १९९८ ला थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तिकीट बारीवर एकच कल्ला उडाला. २५ वर्ष झाल्यानिमित्त निर्मात्यांकडून चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी स्पेशल स्क्रिनिंगला शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जीने हजेरी लावली होती. माध्यमांसोबत बोलत असताना किंग खानने त्याच्या आणि दिग्दर्शक करण जोहरच्या मैत्रीवर महत्वपूर्ण भाष्य केलं आहे. सध्या त्यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आलंय.

करण जोहर दिग्दर्शित ‘कुछ कुछ होता है’ला आज प्रदर्शित होऊन २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट १६ ऑक्टोबर १९९८ ला थिएटरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर संपूर्ण जगभरात ९१.०२ कोटींची कमाई केली होती. चित्रपट प्रदर्शित होऊन आज २५ वर्षे झाल्यामुळे निर्मात्यांनी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला होता.

काल मुंबईतल्या वर्सोव्यामध्ये निर्मात्यांकडून स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पेशल स्क्रिनिंगला शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जीने हजेरी लावली होती. या स्पेशल स्क्रिनिंग दरम्यान चित्रपटातल्या अनेक कलाकारांनीही हजेरी लावली होती. यावेळी अवघ्या काही वेळातच चित्रपटाची सर्व तिकिटे विकली गेली. अवघ्या २५ रुपयांमध्ये चित्रपटाच्या तिकिटाची किंमत असल्याने तिकिटबारी सिनेरसिकांनी तुडूंब गर्दी केली होती.

यावेळी स्पेशल स्क्रिनिंगला शाहरुख खान आणि दिग्दर्शक करण जोहरने संवाद साधला होता. “अनेकांना वाटतं की मी आणि करण जोहर मित्र आहोत. पण असं काही नाही. करण जोहरचे वडील यश जोहर आणि मी दोघं मित्र होतो. त्यांनीच त्या चित्रपटाची निर्मिती केली होती. पण जरीही असं असलं तरी माझी आणि करणची मैत्रीही खूप चांगलीय. हा चित्रपट खूप माझ्या हृदयाजवळचा आहे. हा चित्रपट जेव्हा मी केला तेव्हा मी फक्त २३ वर्षांचा होतो. आणि आता माझा मुलगा आर्यन २३ वर्षांचा आहे. जेव्हा मी पुन्हा मागे वळून पाहतो त्यावेळी मला मुलगा आर्यनला २३ वर्षांपूर्वी लाँच केले होते. त्यावेळी करण फिल्म इंडस्ट्रित नवखा मुलगा होता. आणि इंडस्ट्रित स्वत:चे स्थान पक्के निर्माण केले होते.” अशी प्रतिक्रिया किंग खानने दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरेंकडून युतीचे संकेत

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! खणखणीत भाषनानंतर राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना टाळी, दोघेही खळखळून हसले, पाहा video

SCROLL FOR NEXT