Art Director Milan Dies: साऊथ फिल्म इंडस्ट्रीवर शोककळा, प्रसिद्ध आर्ट डायरेक्टरचं शूटिंगदरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

Art Director Milan Passed Away In Azerbaijan: लोकप्रिय कला दिग्दर्शक मिलन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.
Art Director Milan Passed Away During Shoot In Azerbaijan
Art Director Milan Passed Away During Shoot In AzerbaijanInstagram
Published On

Art Director Milan Passed Away During Shoot In Azerbaijan

टॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी येत आहे. लोकप्रिय कला दिग्दर्शक मिलन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा अझरबैजानमध्ये आगामी चित्रपट ‘विदामुयार्ची’ च्या शुटिंग दरम्यान त्यांचे निधन झाले. रविवारी चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान कला दिग्दर्शकांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्या जाण्याने दाक्षिणात्य सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला असून टॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता अजित कुमारनं पोस्ट शेअर करत वृत्त दिले.

Art Director Milan Passed Away During Shoot In Azerbaijan
Tejas Song Release: कंगनाच्या 'तेजस'मधील पहिलं गाणं आऊट, अरिजित सिंगच्या आवाजातील 'जान दा' गाण्यानं केलं मंत्रमुग्ध

एक सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक म्हणून मिलन यांची टॉलिवूडमध्ये ओळख आहे. त्यांच्या जाण्याचे वृत्त कळताच चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. मिलन यांचे जाणे हे अनेकांसाठी धक्कादायक आहे. मिलन यांनी अनेक तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. मिलन यांनी टॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता थलापती विजय, अजित कुमार, चियान विक्रम, जयम रवी यांच्यासोबत काम केले होते. त्यांचा चाहतावर्गही मोठा होता.

मिलनने १९९९ मध्ये कला दिग्दर्शक आणि प्रॉडक्शन डिझायनर साबू सिरिलसोबत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. या काळात मिलन यांना अनेक दिग्गज कलाकारांसोबत मोठ्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मिलन यांनी आपल्या फिल्मी कारकिर्दित अजित कुमार सोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये थलपथी विजय यांच्या 'सिटिझन', 'रेड और व्हिलन', 'थामीजान' चित्रपटांचा तर चियान विक्रमच्या 'अन्नियां' यांसारख्या चित्रपटांचा प्रामुख्याने समावेश केला जातो.

Art Director Milan Passed Away During Shoot In Azerbaijan
Bhau Kadam - Raj Thackeray: 'करून गेलो गाव'च्या 100 व्या प्रयोगनिमित्त भाऊ कदमने राज ठाकरे यांचे नाव घेत व्यक्त केली इच्छा

अभिनयानंतर मिलनने २००६ मध्ये ‘आर्य’ मधून कला दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली होती. ‘बिल्ला’, ‘वेट्टाइकरण’, ‘थुनिवू’, ‘विवेगम’, ‘वेदालम’ आणि ‘सामी २’ या लोकप्रिय चित्रपटांचा समावेश आवर्जुन केला जातो.

Art Director Milan Passed Away During Shoot In Azerbaijan
Alia Bhatt Get Trolled: PM मोदींच्या भाषणादरम्यान आलिया भट गाढ झोपली, VIDEO व्हायरल होताच अभिनेत्री ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com