सध्या सुपरस्टार धनुषचा 'कुबेर' (Kuberaa) चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशात एक दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'कुबेर' चित्रपट थिएटरमध्ये सुरू असताना अचानक थिएटरचं छत कोसळले आहे. यामुळे प्रेक्षकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. नेमकं काय आणि कसं घडलं जाणून घेऊयात.
बुधवारी तेलंगणामधील मुकुंद थिएटरमध्ये 'कुबेर' सिनेमाचा शो सुरू होता. तेव्हा शो सुरू असताना थिएटरमध्ये एका बाजूच्या छताचा भाग कोसळला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही कोसळलेले छत स्पष्ट पाहू शकता. खुर्च्यांवर छताचा भाग कोसळल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झाले. चित्रपट देखील अर्ध्यावर थांबवावा लागला आहे. तसेच घटनेनंतर प्रेक्षकांना थिएटरबाहेर काढण्यात आले.
थिएटरमध्ये छत कोसळल्यामुळे अनेकजण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. तर प्रेक्षकांनी थिएटर प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे. दुर्घटनेची बातमी समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. छताच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहे.
'कुबेर' चित्रपट 20 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. यात धनुष, नागार्जुन, रश्मिका मंदाना यांनी आपल्या अभिनयाने चारचाँद लावले आहेत. सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची थिएटर गर्दी पाहायला मिळत आहे. 'कुबेर' चित्रपटाने 66 कोटींच्यावर कमाई केली आहे. तर जगभरात 100 कोटींच्यावर व्यवसाय केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.