"Housefull 5 कसा वाटला?"; अभिनेत्याने थेट थिएटर बाहेर जाऊन प्रेक्षकांना विचारला प्रश्न, पाहा VIDEO

Akshay Kumar Video : अक्षय कुमारने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेमकं व्हिडीओमध्ये काय, जाणून घेऊयात.
Akshay Kumar Video
Housefull 5SAAM TV
Published On

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar ) सध्या त्याच्या 'हाऊसफुल 5' चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. 'हाऊसफुल 5' (Housefull 5) 6 जूनला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. दोन दिवसांत चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत जात आहे. प्रेक्षक देखील 'हाऊसफुल 5' चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहेत. अशात अक्षय कुमार नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अक्षय कुमारने हटके स्टाइलमध्ये 'हाऊसफुल 5' चित्रपटाचे लोकांकडून रिव्यू घेतले आहेत. याचाच व्हिडीओ अक्षय कुमारने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अक्षय कुमार चेहऱ्याला किलर मास्क लावून थिएटर बाहेर येणाऱ्या प्रेक्षकांना 'हाऊसफुल 5' चित्रपट कसा वाटला? आणि चित्रपटात कोणाची भूमिका आवडली? हे प्रश्न विचारत होता. यावर प्रेक्षक देखील उत्तर देताना दिसत आहे. प्रेक्षकांकडून "चित्रपट खूप चांगला", "चित्रपट आम्हाला खूप आवडला", "चित्रपट बेस्ट होता", "सर्वच कलाकारांनी चांगल काम केले" अशा प्रतिक्रिया येत होत्या.

अक्षय कुमारने चेहऱ्याला मास्क लावल्यामुळे तेथे त्याला कोणीही ओळखू शकले नाही. अक्षय कुमार वांद्रे येथील थिएटरबाहेर या आगळ्या वेगळ्या स्टाइलने 'हाऊसफुल 5' चित्रपटाचा रिव्यू घेतला. याचा व्हिडीओ अक्षय कुमारने सोशल मीडियावर शेअर करून त्याला हटके कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहिलं की, "असंच... मी आज वांद्रे येथे झालेल्या 'हाऊसफुल 5'च्या शोमधून बाहेर पडणाऱ्या लोकांचे मुलाखती घेण्यासाठी किलर मास्क घालून थिएटर बाहेर गेलो. शेवटी पकडला जाणार होतो मात्र त्या आधीच तेथून पळ काढला...मस्त अनुभव..."

अक्षय कुमारच्या या व्हिडीओवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'हाऊसफुल 5' हा 'हाऊसफुल' फ्रँचायझीचा 5 वा भाग आहे. 'हाऊसफुल 5'मध्ये कॉमेडी आणि ॲक्शन पाहायला मिळत आहे. 'हाऊसफुल 5'ची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी यांनी केले आहे.

Akshay Kumar Video
Sonali Bendre : "तेव्हा मी..."; सोनाली बेंद्रेने राज ठाकरेंसोबतच्या नात्याबाबत सोडलं मौन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com