'क्रांतिज्योती विद्यालय' चित्रपट 1 जानेवारी 2026ला रिलीज झाला.
'क्रांतिज्योती विद्यालय' चित्रपट हेमंत ढोमे दिग्दर्शित आहे.
'क्रांतिज्योती विद्यालय' चित्रपट आता परदेशात पाहायला मिळणार आहे.
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटाची सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. चित्रपटाची गाणी ट्रेंड करताना दिसत आहेत. हा चित्रपट 1 जानेवारी 2026ला रिलीज झाला. चित्रपटात मराठी शाळा आणि मराठी भाषेबद्दलचे मत, विचार मांडले आहेत. ज्यामुळे चित्रपटाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळवले आहे. थिएटर हाऊसफुल पाहायला मिळत आहेत.
'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपट आता परदेशात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाला भारतात उदंड प्रतिसाद मिळत आहे. मराठी चित्रपट परदेशात रिलीज होणे, म्हणजे चित्रपटाने गगन भरारी घेतली आहे. याची खास पोस्ट 'चलचित्र मंडळी' या इन्स्टाग्राम पेजने तसेच हेमंत ढोमेने देखील केली आहे. ही आनंदाची बातमी क्षिती जोग, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर देताना दिसत आहेत.
व्हिडीओमध्ये शेअर केलेल्या माहितीनुसार, 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपट परदेशात दुबई, अबुधाबी, ओमान, शारजाह, बहरीन (Dubai, Abu Dhabi, Oman, Sharjah, Bahrain) येथे पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या पोस्टला प्रेक्षक भरभरून कमेंट्स करत आहेत. चित्रपटाचे, कलाकारांच्या यशाचे कौतुक करत आहेत.
'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटात तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. यात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, पुष्कराज चिरपुटकर, हरीश दुधाडे, कादंबरी कदम, क्षिती जोग, निर्मिती सावंत आणि प्राजक्ता कोळी हे झळकले आहेत.मीडिया रिपोर्टनुसार, 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटाने आता पर्यंत 10 कोटी रुपयांच्यावर कमाई केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.