Famous Singer Video SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Singer Video : ३० दिवसांत केलं १० किलो वजन कमी; प्रसिद्ध गायिका लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान स्टेजवर कोसळली

Famous Singer collapse On stage : प्रसिद्ध गायिका लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान अचानक स्टेजवर कोसळली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामागचे नेमकं कारण काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध गायिकेने ३० दिवसांत १० किलो वजन कमी केले आहे.

गायिका लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान अचानक स्टेजवर कोसळली.

गायिकेने चाहत्यांची माफी मागितली.

प्रसिद्ध दक्षिण कोरियाची पॉप गायिका ह्युना हिचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात ती एका लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान अचानक स्टेजवर कोसळलेली पाहायला मिळत आहे. यासंदंर्भात तिने चाहत्यांची माफी देखील मागितली आहे. वॉटरबॉम्ब 2025 मकाऊ म्युझिक फेस्टिव्हल (Waterbomb 2025 Macau) दरम्यान ह्युना परफॉर्मन्स करताना ह्युना अचानक चक्कर येऊन पडली.

ह्युना जेव्हा पडली तेव्हा ती हिट गाणे 'बबल पॉप' सादर करत होती. ह्युना स्टेजवर अचानक कोसळताच तिचे सह कलाकार आणि सुरक्षा कर्मचारी तिच्या मदतीला धावले. हा व्हिडीओ इंटरनेटवर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. ह्युना 33 वर्षांची आहे. तिने आपल्या गाण्याने चाहत्यांना वेड लावले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ह्युना हिने अलीकडेच खुलासा केला की, तिने फक्त 30 दिवसांत 10 किलो वजन कमी केले. लग्नानंतर जेव्हा तिचे वजन काही प्रमाणात वाढले. तेव्हा सोशल मीडियावर तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली. तिने सांगितल्याप्रमाणे लग्नाच्या दरम्यान तिने खूप खाल्ले ज्यामुळे तिचे वजन वाढले. त्यामुळे ह्युनाने फक्त 30 दिवसांत 10 किलो वजन कमी केले. मात्र याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर झाला. डॉक्टरांच्या मते, कमी वेळात जास्त वजन कमी केल्याने पौष्टिक घटकांची कमतरता, अशक्तपणा आणि थकवा येऊ शकतो, म्हणूनच लाईव्ह शो दरम्यान ती चक्कर येऊन पडली.

लाईव्ह परफॉर्मन्समधील या घटनेनंतर शुद्ध आल्यावर ह्युनाने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करून चाहत्यांची माफी मागितली. तिने लिहिले, "मला खूप वाईट वाटते. मला फक्त माझे सर्वोत्तम प्रयत्न करायचे होते. मात्र आता मला काय घडले ते आठवत नाही. कदाचित मी स्वतःला खूप जास्त Force केला. मी आता माझ्या आरोग्यावर अधिक लक्ष केंद्रित करेन. मला इतके प्रेम आणि पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: चाणक्यांचा इशारा! 'या' ५ प्रकारच्या लोकांपासून दूर राहा, नाहीतर आयुष्य होईल बर्बाद

Palak Patta Chaat Recipe : हिवाळ्यात घ्या चटपटीत नाश्त्याचा आस्वाद, झटपट बनवा पालक पत्ता चाट

Maharashtra Live News Update: सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गांवर बोरामणी गावाजवळ कंटेनरला अपघात

Maharshtra Politics: बीएमसी आरोग्य केंद्राचं फित कोण कापणार? मालाडमध्ये भाजप–काँग्रेस आमनेसामने|VIDEO

Money Saving Tips: खर्च खूप वाढतोय अन् बचत कमी होतेय? वेळीच या स्टेप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT