Shreya Maskar
मराठी पॉप सिंगर संजू राठोड गाण्याआधी मेकॅनिकल इंजिनियरिंगचा अभ्यास करत होता.
संजू राठोड 'गुलाबी साडी' या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या झोकात आला.
महाराष्ट्रातील धानवड येथे संजू राहायचा जेथे संगीत शिक्षका नव्हते. तसेच इंटरनेट सुविधा उपलब्ध नव्हती.
संजू राठोड हा एक लाजाळू मुलगा होता. स्टेजवर गाणे सोडा बोलणेही त्याला कठीण जायचे.
संजूचे पहिलं ब्रेकअप झाल्यावर त्याला गाणं सुचले. त्याच्या संगीताचा प्रवास सुरू झाला.
संजू हळूहळू स्थानिक कार्यक्रमांमध्ये गाऊ लागला. लोकांना त्याचा आवज आवडायला लागला.
2017 ला शिक्षण सोडून तो कामासाठी मुंबईत आला. पैसे नसताना मुंबईत जगण्याचा संघर्ष त्याने केला.
सेकंड-हँड लॅपटॉप, बेसिक इअरफोनसह त्याने रॅप करण्यास सुरूवात केली.
'छमिया', 'स्टाईल मार्टे' या गाण्यांनंतर त्यांनी संजू राठोडचे 'गुलाबी साडी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि तो स्टार बनला.
संजू राठोडने 'गुलाबी साडी'नंतर अनेक सुपरहिट गाणी गायली. यात 'शेकी शेकी', 'काली बिंदी', 'नऊवारी' यांचा समावेश आहे.