Dholkichya Talavar Winner  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dholkichya Talavar: कोकणकन्या ठरली ‘ढोलकीच्या तालावर’ची लावणी सम्राज्ञी, नेहा पाटीलने ट्रॉफिवर कोरलं नाव

Kokankanya Neha Patil: आपल्या दमदार नृत्यशैली आणि अदाकारीच्या माध्यमतून सर्वांचे मनोरंजन करणारी कोकणकन्या नेहा पाटीलनेया शोची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.

Priya More

Neha Patil Winner Of Dholkichya Talavar:

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय शो ‘ढोलकीच्या तालावर’चा (Dholkichya Talavar) महाअंतिम सोहळा रविवारी मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलं होतं. अखेर या शोच्या माध्यमातून महाराष्ट्राला नवीन लावणी सम्राज्ञी मिळाली आहे. आपल्या दमदार नृत्यशैली आणि अदाकारीच्या माध्यमतून सर्वांचे मनोरंजन करणारी कोकणकन्या नेहा पाटीलने (Neha Patil) या शोची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे.

पेणची नेहा पाटील 'ढोलकीच्या तालावर' या शोची विजेती ठरली आहे. तर धुळ्याचा शुभम बोराडे प्रथम उपविजेता ठरला आणि नम्रता सांगुळे ही द्वितीय उपविजेती ठरली आहे. नेहा पाटीलने आपल्या अथक परिश्रम आणि नृत्य कौशल्याच्या माध्यमातून अखेर या शोच्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. सध्या नेहा पाटीलवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

यावर्षी 'ढोलकीच्या तालावर' या शोने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या उत्कृष्ट लावणी नृत्यांगणांनी यावेळी ‘ढोलकीच्या तालावर’चे हे पर्व चांगलंच गाजवलं. कलर्स मराठीवरील या शोने ढोलकिच्या तालावर सर्व नृत्यांगणांसोबत प्रेक्षकांनाही थिरकायला लावले. या शोची विजेती कोण ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर या शोला या पर्वाची विजेती नेहा पाटीलच्या रुपामध्ये मिळाली आहे.

नेहाने पहिल्या दिवसापासूनच तिच्या उत्तम नृत्याने आणि मनमोहक अदाकारांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं होतं. नेहाचा या शोमधील प्रवास हा सर्वांच्या लक्षात राहण्यासारखा आहे. तिचे आपल्या नृत्यावर असलेलं प्रभूत्व, कलेप्रती असलेलं प्रेम आणि कौशल्य याच्या माध्यमातून तिने या शोची ट्रॉफी जिंकण्याचा मान पटकावला आहे. महत्वाचे म्हणजे यंदाच्या पर्वामध्ये १२ मुलींमध्ये एक मुलगा या शोमध्ये सहभागी झाला होता. त्या शुभम बोराडेने देखील सर्वांचे चांगलंच मनोरंजन केले. तो या शोचा उपविजेता ठरला आहे.

या शोमध्ये टॉप स्पर्धकांमध्ये नेहा पाटील , शुभम बोराडे, समता आमणे, नम्रता सांगुळे, पूर्वा साळेकर आणि तनुजा शिंदे यांनी बाजी मारली होती. या सर्व स्पर्धकांनी शेवटपर्यंत एकमेकांना जबरदस्त टक्कर दिली. शेवटी नेहा पाटील, शुभम बोराडे आणि नम्रता सांगुळे या तीन स्पर्धकांनी 'ढोलकीच्या तालावर'च्या या पर्वात बाजी मारली. या तिन्ही स्पर्धकांचे कौतुक केले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT