Gandhi Jayanti: महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित 'हे' चित्रपट पाहिलेत का?, तुमच्यातील देशभक्ती होईल जागृत

Mahatma Gandhi Movie: बॉलीवूडमध्येही महात्मा गांधीजींच्या स्मरणार्थ अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत.
Bollywood Movie On Mahatma Gandhi
Bollywood Movie On Mahatma GandhiSaam Tv
Published On

Bollywood Movie On Mahatma Gandhi:

देशाचे 'राष्ट्रपिता' म्हणून ओळखले जाणारे महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांची आज जयंती आहे. महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. यावर्षी आपण महात्मा गांधीजींची १५२वी जयंती साजरी करत आहोत. आज संपूर्ण देशभरामध्ये गांधी जयंतीनिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Bollywood Movie On Mahatma Gandhi
Dunki Remake of Malayalam Movie: शाहरुख खानचा ‘डंकी’ साऊथचा रिमेक?, नेटकऱ्यांनी दिग्दर्शकासह किंग खानला धरलं धारेवर

देशाच्या स्वातंत्र्यात महात्मा गांधी यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान आहे. महात्मा गांधी यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले. बॉलिवूडमध्येही महात्मा गांधीजींच्या स्मरणार्थ अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत. या चित्रपटाद्वारे महात्मा गांधी यांचे आयुष्य, त्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी केलेलं योगदान दाखवण्यात आले आहे. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अनेकांना सुट्टी आहे. त्यामुळे तुम्ही आज हे चित्रपट नक्की पाहू शकता.

Bollywood Movie On Mahatma Gandhi
Ranveer Singh Look: 'सिंघम अगेन'चा श्रीगणेशा! चित्रपटाच्या सेटवरील रणवीर सिंगचा फोटो व्हायरल

गांधी (१९८२) -

महात्मा गांधीजींवर आधारित 'गांधी' या चित्रपटात ब्रिटिश अभिनेता बेन किंग्सले मुख्य भूमिकेत होता. रिचर्ड अ‍ॅटनबरो यांनी १९८२ मध्ये या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटाला ८ ऑस्कर पुरस्कार मिळाले. हा चित्रपट गांधीजींच्या जीवनावर तयार करण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे.

Bollywood Movie On Mahatma Gandhi
Akshay Kumar Post: 'स्वच्छता ही सेवा' म्हणत परदेशातून अक्षय कुमारचा PM मोदींच्या अभियानात सहभाग

द मेकिंग ऑफ महात्मा गांधी (१९९६) -

श्याम बेनेगल यांच्या 'द मेकिंग ऑफ महात्मा गांधी' या चित्रपटात अभिनेता रजत कपूरने गांधीजींची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटाद्वारे महात्मा गांधींनी त्यांच्या आयुष्यातील २१ वर्षे दक्षिण आफ्रिकेत घालवल्याचे दाखवण्यात आले आहे.

Bollywood Movie On Mahatma Gandhi
रजनीकांत यांचा 'लाल सलाम', चित्रपटाच्या पोस्टरसह रिलीज डेट केली जाहीर

हे राम (२०००) -

'हे राम' चित्रपट महात्मा गांधींच्या हत्येवर आधारीत आहे. नसीरुद्दीन शाह यांनी या चित्रपटात महात्मा गांधींची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात शाहरुख खान, राणी मुखर्जी, अतुल कुलकर्णी, गिरीश कर्नाड आणि ओम पुरी हे प्रमुख भूमिकेत दिसले.

Bollywood Movie On Mahatma Gandhi
Mahira Khan 2nd Wedding: प्रसिद्ध अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लगीनगाठ! नवरीला पाहताच नवरदेव भावुक, Video व्हायरल

गांधी माय फादर (२००७) -

'गांधी माय फादर' चित्रपट महात्मा गांधी आणि त्यांचा मुलगा हिरालाल गांधी यांच्याशी असलेल्या त्यांच्या नात्यावर आधारित आहे.दर्शन जरीवाला याने चित्रपटात गांधींची भूमिका साकारली होती. तर अभिनेता अक्षय खन्ना हिरालाल गांधीच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट अतिशय जबरदस्त होता. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

आय डिड नॉट किल गांधी (२००५) -

'आय डिड नॉट किल गांधी' या चित्रपटात अनुपम खेर आणि उर्मिला मातोंडकर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट एका निवृत्त हिंदी प्राध्यापकाभोवती फिरतो ज्याला आपण महात्मा गांधींची हत्या केली आहे असे वाटते. या चित्रपटासाठी अनुपम खेर यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

Bollywood Movie On Mahatma Gandhi
Fukrey 3 And Chandramukhi 2 4th Day Collection: ‘फुक्रे ३’च्या कमाईचा आलेख चढताच, ‘द व्हॅक्सिन वॉर’ आणि ‘चंद्रमुखी २’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com