Ankita Walawalkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar : कोकण किनारा अन् कुटुंबाची साथ; अंकिताच्या प्री-वेडिंगनं वेधलं लक्ष, पाहा VIDEO

Ankita-kunal Pre Wedding : अंकिता वालावलकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच तिने आपल्या प्री-वेडिंगचा एक खास व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Shreya Maskar

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अंकिताही मिडिया इन्फ्लुएंसर आहे. 'बिग बॉस मराठी 5'मुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. तिने आपल्या स्वभावाने चाहत्यांना वेड लावले आहे. काही दिवसांपूर्वी अंकिता प्री वेडिंग (Pre Wedding) शूटची एक झलक दाखवली होती. चाहते तिचे 'आगळं वेगळं प्री वेडिंग' शूट पाहण्यासाठी उत्सुक होते.

अखेर आता अंकिता वालावलकरने आपल्या खास प्री वेडिंग शूटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. जो व्हिडीओ पाहून चाहते भावुक झाले आहेत. अंकिता मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगतशी लग्नगाठ बांधणार आहे. अंकिताच्या प्री वेडिंग शूटमध्ये तिचे आई-बाबा आणि तिच्या दोन्ही बहि‍णींचा समावेश होता. कुणाल (Kunal Bhagat) अंकिता कुटुंबासोबत मजा मस्ती करताना पाहायला मिळत आहे. अंकिताने या प्री वेडिंगला एक खास कॅप्शन दिले आहे. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

अंकिता वालावलकर पोस्ट

"सुरुवातीला कुठे होतं ओ प्री वेडिंग पण लग्न टिकलीच ना? आत्तापेक्षा तरी जास्तच…सगळ्याच गोष्टी इतरांसारख्या केल्या तरचं आपल्याला समाजात स्थान मिळेल अस नाही…आयुष्य ज्या व्यक्तीसोबत घालवणार त्या व्यक्तीसोबतच photoshoot म्हणजे प्री वेडिंग नव्हे तर आपल्या मनात असलेल्या सगळ्या अपूर्ण गोष्टी पूर्ण करण आणि नवीन आयुष्याकडे वळणं हे खरं प्री वेडिंग… इतर लोक जे करतात ते आपण फक्त पाहत राहावे...मी अस म्हणणार नाही की तुम्ही हेच करा पण करून बघायला काय हरकत आहे? बाकी कसं वाटल माझं प्री वेडिंग?"

लेकीच्या लग्नाचा आनंद अंकिताच्या आई-बाबांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. तिचे हे खास प्री वेडिंग पाहून चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. अंकिता आणि कुणाल आई-बाबांसोबत बोटीतून प्रवास करताना पाहायला मिळत आहे. तसेच कुणाल, अंकिता आणि तिच्या बहिणी एकत्र खेळ देखील खेळतात. शेवटी हे सुखी कुटुंब एकत्र जेवताना दिसत आहे. अंकिता वालावलकरच्या लग्नाची आता चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Elphinstone bridge : मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजच्या पाडकामाला सुरुवात; नागरिकांचा प्रशासनावर संताप, VIDEO

Volvo: 'सुपर ३०' ! वॉल्वो कंपनीची नवीन शानदार, जबरदस्त EX 30 कार; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

Mumbai Local Train: मुंबईकरांनो, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा; जाणून घ्या कुठे कसा असेल मेगाब्लॉक

Chhagan Bhujbal News : भुजबळांचा डाव, 10 टक्के आरक्षणावर घाव? मंत्र्यांचा भुजबळांचा मराठा नेत्यांना थेट सवाल

Maharashtra Politics : ठाण्याच्या सुभेदारीवरुन नाईक-शिंदे भिडले; शिंदे-भाजपसाठी ठाणे महत्वाचं का? वाचा

SCROLL FOR NEXT