Salman Khan : 'तुरुंगात असताना झोप...' भाईजानने केला कटू आठवणींचा खुलासा

Salman Khan Talk On Jail Memories : सलमान खान कायम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. अलिकडेच त्याने जेलमधील आपल्या अनुभवावर भाष्य केले आहे.
Salman Khan Talk On Jail Memories
Salman KhanSAAM TV
Published On

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमधून चाहत्यांना भुरळ घातली आहे. सलमान खानचे वैयक्तिक आयुष्य कायम वादात आणि चर्चेत राहिले आहे. सध्या सलमान खान त्याचा आगामी चित्रपट 'सिकंदर'च्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे.

अलिकडेच सलमान खान आणि अरहान खान एका पॉडकास्ट शोमध्ये सहभागी झाले होते. तेव्हा सलमान खानने आपला पुतण्या अरहान खानला रिलेशनशिपबद्दल देखील सल्ला दिला आहे. या पॉडकास्टमध्ये सलमान खानने आपल्या आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगावर भाष्य केले आहे. सलमान खानने आपल्या तुरुंगातील दिवसांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत.

'हिट अँड रन' प्रकरणात सलमान खान तुरुंगात राहिला होता. तेव्हाचा अनुभव शेअर करत भाईजान म्हणाला की, "तुरुंगात असताना मी खूप झोपलो. कारण मी दिवसातून फक्त 2 तास झोपतो आणि महिन्यातून 7-8 तासांची झोप घेतो. मी शूटिंगच्या दरम्यान सेटवर शॉट तयार होत असताना पाच मिनिटांचा ब्रेक मिळतो तेव्हा ही झोपतो. मात्र मी जेव्हा तुरुंगात होतो तेव्हा खूप झोपलो. कारण तेव्हा मी तिथे काहीही करू शकत नव्हतो. "

पुढे सलमान खान म्हणाला की, "मी फ्लाईटमध्ये गडबड असतानाही झोपतो. नेहमी कारण दिल्यामुळे यशामध्ये अडथळे निर्माण होतात. तुम्ही थकण्याचा विचार न करता उठा आणि काम करा. आयुष्यात नेहमी तुमच्या मित्रांच्या आणि कुटुंबाच्या पाठीशी नेहमी उभे राहा." भाईजानच्या 'सिकंदर' चित्रपटात साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना देखील आहे. 'सिकंदर' चित्रपट यावर्षी ईदला रिलीज होणार आहे. चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Salman Khan Talk On Jail Memories
Chhaava : रिलीज आधीच 'छावा'च्या 'या' संवादांवर कात्री, सेन्सॉर बोर्डचा मोठा निर्णय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com