KK Saam Tv
मनोरंजन बातम्या

...त्यानंतर केके आले मुंबईत; स्वतःच सांगितला होता कारकिर्दीचा महत्वाचा टप्पा

केके यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. गायक(Singer) , कलाकार त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : गायक केके (KK) यांचे मंगळवारी रात्री कोलकाता (Kolkata) येथे निधन झाले. एका लाइव्ह कॉन्सर्टमधून परतल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. हॉटेलवर गेल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने सीएमआरआई रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले होते. केके यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. गायक(Singer) , कलाकार त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. 'पल' या पहिल्या अल्बमने केके यांना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवलं होतं. 'पल', 'यारों' सारख्या प्रसिद्ध गाण्यांचा समावेश होता. 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटातील 'तडप तडप के' हे गाणं केकेंच्या करिअरमधला मैलाचा दगड ठरला. केके हे मुंबईत (Mumbai ) आपले नशीब आजमावण्यासाठी आले होते. एका मुलाखतीतच त्यांनी या मुंबई प्रवासाबद्दल माहिती दिली होती. प्रसिद्ध पार्श्वगायक हरिहरन यांच्या सांगण्यावरूनच ते मुंबईत आले होते. (kk singer latest news In Marathi )

हे देखील पाहा -

केके यांनी एका वाहिनीवर मुलाखत देताना सांगितले होते की, १९९४ साली मुंबईमध्ये संगीत क्षेत्रात येण्याआधी ते हॉटेलमध्ये काम करत होते. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पत्नी ज्योती यांनी पाठिंबा दिला. आपल्या यशाचे श्रेय ते नेहमीच आपल्या पत्नीलाच देत होते. 'दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात गात होतो, तेव्हा गायक हरिहरन यांनी माझे गाणे ऐकले. माझे खूप कौतुक केले आणि मला मुंबईला येण्यासाठी सांगितले.' असे केके यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. त्यानंतर काही महिन्यांत केके हे मुंबईत आले होते.

केके यांचं पहिलं गाणं...

'माचीस' या हिंदी चित्रपटातील 'छोड़ आए हम वो गलियां' हे त्यांच्या कारकिर्दीतील पहिलं गाणं होतं. या गाण्यासाठी त्यांना हरिहरन, सुरेश वाडकर, विनोद सेहगल या दिग्गज गायकांची साथ लाभली. हे गाणं सुपरहिट झालं आणि आज देखील सतत ऐकलं जाणार असं हे गाणं आहे.

केके यांनी अनेक भाषांमधून गाणी गायली

केके यांनी हिंदी सोबतच तमीळ, तेलुगू, मराठी, कन्नड, बंगाली, मल्याळम, गुजराती, आणि असामी अशा अनेक भाषांमधून गाणी गायली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

स्कॅममध्ये अडकली अन् डोक्यावर २८ लाखांचं कर्ज; बँकेतच स्वत:ला संपवलं; चिठ्ठीतून शेवटची इच्छा केली व्यक्त | Crime

भाजप नेते प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले अन्...; वसईतल्या कार्यक्रमात थरारक प्रसंग|VIDEO

Chakan Fort : पुण्यातील चाकण किल्ला पाहिला का? सुट्टीत मुलांसोबत नक्की भेट द्या

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमधील फर्निचर मार्केटजवळ इमारतीचा सज्जा कोसळला; एका कामगाराचा मृत्यू

Solo Trip Tips: पहिल्यांदाच सोलो ट्रिपला जाताय? तर 'या' महत्वाच्या गोष्टी विसरु नका

SCROLL FOR NEXT