अनेक गायकांना प्रेरणा देणारे केके यांचा 'हा' प्रसिद्ध गायक होता आदर्श

गायक कृष्ण कुमार कुन्नथ म्हणजेच केके यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.
kk singer latest news
kk singer latest newsSaam Tv
Published On

मुंबई : 'तू ही मेरी शब है', 'सच कह रहा है दीवाना', 'लबों को', 'तड़प तड़प के' अशा अनेक प्रसिद्ध गाण्यांचे गायक कृष्ण कुमार कुन्नथ म्हणजेच केके (KK) यांचे मंगळवारी रात्री कोलकाता येथे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे (Death ) त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. देशसहित जगभरातील त्यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. केके यांच्याकडून नव्या पिढीच्या गायकांना (Singer ) खूप प्रेरणा मिळाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? केके सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार (Kishor Kumar ) यांच्यापासून प्रेरित झाले होते. ते कधीच शास्त्रीय संगीत (Music ) शिकले नव्हते. ते किशोर कुमार यांच्या गायनामुळे प्रभावित झाले आणि त्यांनी गायनाला सुरुवात केली. खुद्द केके यांनीच एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. (kk singer latest news In Marathi )

हे देखील पाहा -

केके यांनी एका वृत्तपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, किशोर कुमार हे त्यांच्या प्रेरणास्थानी होते. केके यांनी कधीही शास्त्रीय संगीत शिकले नव्हते. काही दिवसांसाठी एका संगीत शाळेत गेले होते , परंतु तेथे त्यांना संगीताचे धडे घेण्याची आवश्यकता वाटली नव्हती, असेही केके यांनी या मुलाखतीत सांगितले होते.

'सुरुवातीपासूनच गाणे ऐकूनच मला गाणे गाता येत होते, हे माझ्यासाठी वरदान आहे. मला नंतर कळले की किशोरदाही कधीच संगीत शिकले नव्हते, त्यामुळे माझ्याकडे संगीत शिक्षण न घेण्याचे हे देखील एक कारण होते', असंही केके यांनी मुलाखतीत सांगितले. त्यांच्या वडिलांनीही त्यांच्यावर संगीतासाठी कोणताही प्रकारचा दबाव कधी टाकला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

kk singer latest news
केकेच्या मृत्यूचं गूढ वाढलं! डोक्याला अन् चेहऱ्याला जखमा; पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यूची नोंद

जेव्हा हरिहरन यांनी केकेंना मुंबईला बोलावले...

केकेंसाठी किशोर कुमार यांच्या सोबतच अनेक दिग्गज गायक आणि संगीतककार प्रेरणास्थानी होते. गायक हरिहरन यांनी त्यांना मुंबईत येऊन संगीत क्षेत्रात नशीब आजमावण्याचा सल्ला दिला होता. केके जेव्हा दिल्लीत गाणे म्हणत होते, तेव्हा हरिहरन यांनी त्यांचे गाणे ऐकले होते. त्यानंतर हरिहरन यांनी त्यांचे कौतुक केले आणि त्यांना मुंबईला येण्याचा सल्ला दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com