The Railway Men Teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

The Railway Men Teaser: भोपाळ गॅस दुर्घटनेची भीषणता OTT वर पाहायला मिळणार, ‘द रेल्वे मेन’चा टीझर रिलीज

The Railway Men Web Series Teaser Released: सत्य घटनेवर आधारित ‘द रेल्वे मेन’ या वेबसीरीजचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

Chetan Bodke

The Railway Men Teaser Out

गेल्या काही दिवसांपूर्वी बॉक्स ऑफिसवर टिनू सुरेश देसाई दिग्दर्शित 'मिशन राणीगंज' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. रियल लाईफ स्टोरी असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जेमतेम ३२ कोटींच्या आसपास गल्ला जमावला होता. अशातच लवकरच येत्या काही दिवसात चित्रपटानंतर प्रेक्षकांच्या भेटीला सत्य घटनेवर आधारित ‘द रेल्वे मेन’ ही वेबसीरीज येणार आहे. नुकताच ‘द रेल्वे मेन’ या वेबसीरीजचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कथेबद्दल थोडक्यात सांगायचे तर, २ डिसेंबर १९८४ या रात्री भोपाळमधील युनियन कार्बाइड कंपनीच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती झाली होती. ही रात्र खरंतर फक्त भोपाळवासीयांसाठीच नाही तर अवघ्या देशासाठी काळी रात्र ठरली. त्या वायू गळतीमुळे, १५ हजारांहून अधिक निष्पाप लोकांनी आपला जीव गमवावा लागला होता.

याच घटनेवर ही सीरिज बेतलेली आहे. या घटनेचा आज जरी कधी विषय निघाला तरी, अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. १८ नोव्हेंबरपासून ही वेबसीरीज जगभरात सर्वत्र नेटफ्लिक्सच्या माध्यमातून पाहता येणार आहे. या वेबसीरीजचं नाव ‘द रेल्वे मेन’ असे आहे.

चार एपिसोड असलेल्या या वेबसीरीजची कथा सत्य घटनेवर आधारित असून सध्या प्रेक्षकांचा कल सत्य घटनेवर आधारित कलाकृती पाहण्यामध्ये सर्वाधिक आवड आहे. (OTT)

निर्मात्यांनी शेअर केलेल्या टीझरमध्ये, काही तीव्र, भयानक दृश्ये, लोकांचा संघर्ष या सीन्समुळे आपल्या काळजाचा ठोका चुकवणारे सीन्स पाहायला मिळतील. विषारी वायू दुर्घटनेमध्ये, ४ वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे माणसं घडलेल्या दुर्घटनेत नेमकं कशापद्धतीने लोकांचे प्राण वाचवतात, याची एक छोटीशी झलक टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. टीझरमधून फार काही सांगितलं नसलं तरी प्रेक्षकांची उत्सुकता याने कायम ठेवली आहे. (Web Series)

प्रसिद्ध दिग्दर्शक राहुल रवैल यांचा मुलगा शिव रवैल या सीरीजच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. ‘द रेल्वे मेन’ (The Railway Men) ची निर्मिती YRF एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्स यांनी एकत्रित येऊन केली आहे तर याची कथा आयुष गुप्ता यांनी लिहिली आहे. के मेनन, आर माधवन, बाबिल खान आणि दिव्येंदु मुख्य भूमिकेत असलेल्या ‘द रेल्वे मेन’ या वेबसीरीजचा टीझर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. ही वेबसीरीज ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT